100 कोटींची वाढीव मंजुरी, तरी उमरखेडचे रस्ते अर्धवट

    दिनांक :23-May-2026
Total Views |
प्रशासन झोपेत, नागरिक पावसाच्या तोंडावर संकटात

उमरखेड, 
Umarkhed: Unfinished Roads शहरातील हॅम2 अंतर्गत सुरू असलेले रस्ते विकासाचे काम सध्या पूर्णतः रखडल्याचे चित्र दिसत असून यामागे शासकीय यंत्रणांमधील समन्वयाचा अभाव स्पष्टपणे समोर येत आहे. रस्ते कामासाठी तब्बल 100 कोटी रुपयांची वाढीव मंजुरी मिळाल्याची चर्चा असताना प्रत्यक्षात मात्र शहरातील नागरिकांना धूळ, चिखल, अर्धवट नाल्या आणि उखडलेल्या रस्त्यांचा सामना करावा लागत आहे.
 
 
rastsa
 
उपविभागीय कार्यालय, तहसील प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, रस्ते विकास महामंडळ, नगर परिषद आणि पोलिस या सर्व यंत्रणांकडून रस्त्यालगतचे अतिक्रमण हटविण्यात अपयश येत असल्याचे चित्र आहे. एकीकडे प्रशासन बैठका घेत असल्याचा दावा करत असताना दुसरीकडे अतिक्रमण हटत नसल्यामुळे रस्ते बांधकामाचे काम अक्षरशः ठप्प झाले आहे. या संपूर्ण गोंधळाचा सर्वाधिक फटका रस्ते बांधकाम करणाèया ठेकेदाराला बसत असल्याचे समजते. वाढता खर्च, साहित्याचे वाढलेले दर आणि प्रशासनाकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्यामुळे संबंधित ठेकेदार आता काम अर्धवट सोडण्याच्या मनःस्थितीत असल्याची माहिती समोर येत आहे.
 
 
अशीच परिस्थिती राहिली तर आगामी पावसाळ्यात शहरातील नागरिकांचे हाल अपरिहार्य ठरणार आहेत. महागाव रस्ता ते नांदेड रस्ता या शहरातील दुसèया टप्प्यातील कामाची जबाबदारी दुसèया ठेकेदाराकडे देण्यात आली असली तरी अद्याप त्या कामालाच सुरुवात झालेली नाही. त्यामुळे नवीन नाल्या, फूटपाथ, रस्त्याचे काँक्रिटीकरण आणि वाहतूक व्यवस्थेचे नियोजन हे सर्वच प्रश्न हवेतच लटकले आहेत. दरम्यान पोलिस ठाणे ते ढाणकी रस्ता दरम्यान करण्यात आलेल्या सुमारे 14 कोटी रुपयांच्या सिमेंट रस्त्याच्या कामाबाबतही नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. नुकतेच तयार झालेले रस्ते आता मच्छी खडकप्रमाणे दिसू लागले असून अनेक ठिकाणी रस्त्यातून गिट्टी बाहेर येताना दिसत आहे.
 
 
Umarkhed: Unfinished Roads  रस्त्याच्या काही भागात नाल्यांचे उतार चुकीचे असून अनेक ठिकाणी नाल्यांची कामे अर्धवट अवस्थेत पडून आहेत. विशेष म्हणजे रस्त्यावर अद्याप पथदिवे बसविण्यात आले नसल्याने रात्रीच्या वेळी अपघाताचा धोका वाढला आहे. नागरिकांमधून आता या संपूर्ण कामांची उच्चस्तर आणि तांत्रिक चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. हे रस्ते विकासाचे काम आहे की ‘निकृष्ट कामाचा उत्कृष्ट नमुना’ असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. स्थापत्य अभियंत्यांच्या देखरेखीखाली झालेले हे काम पाहिल्यानंतर कुठेही समानता, दर्जा किंवा नियोजन दिसत नसल्याची टीका होत आहे. पावसाळा तोंडावर आलेला असताना प्रशासन अजूनही फाईली, बैठका आणि जबाबदाèयांच्या खेळात अडकलेले दिसत आहे. शहरातील जनतेचा एकच सवाल आहे  कोट्यवधींचा निधी मंजूर होतो, मग दर्जेदार रस्ते आणि पूर्ण काम का दिसत नाही..? आता वरिष्ठ अधिकारी या गंभीर प्रकाराची दखल घेणार का, दोषींवर कारवाई होणार का आणि रखडलेली कामे पूर्ण होणार का, याकडे संपूर्ण उमरखेडकरांचे लक्ष लागले आहे.