भुवनेश्वर कुमारच्या नावावर नकोसा विक्रम!

    दिनांक :23-May-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Unwanted Record to Bhuvneshwar भुवनेश्वर कुमार हा आयपीएलमधील सर्वात विश्वासार्ह गोलंदाजांपैकी एक मानला जातो. अचूक लाइन-लेंथ आणि शांत स्वभावासाठी ओळखला जाणारा हा अनुभवी वेगवान गोलंदाज यंदाच्या हंगामात शानदार कामगिरी करत आहे. मात्र, सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यानंतर त्याच्या नावावर एक असा विक्रम नोंदवला गेला आहे, जो कोणत्याही गोलंदाजाला नको असतो. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात भुवनेश्वर कुमारने चार षटकांत तब्बल ५१ धावा खर्च केल्या. विशेष म्हणजे, या सामन्यात त्याला एकही विकेट मिळवता आली नाही. यासह आयपीएलच्या इतिहासात एका डावात ५० पेक्षा अधिक धावा देण्याची त्याची ही नववी वेळ ठरली आहे.
 
Bhubaneswar कुमार
 
 
या विक्रमामुळे भुवनेश्वरने मोहम्मद शमी याच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. शमीनेदेखील आयपीएलमध्ये नऊ वेळा एका डावात ५० हून अधिक धावा दिल्या आहेत. या यादीत मोहम्मद सिराज तिसऱ्या स्थानावर असून त्याने आठ वेळा हा नकोसा टप्पा गाठला आहे. भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर इतकी मोठी फटकेबाजी होणे क्वचितच पाहायला मिळते. आयपीएल २०२६ मधील सुरुवातीच्या १३ सामन्यांत त्याने अत्यंत नियंत्रित गोलंदाजी केली होती. या काळात त्याने एका डावात ४० पेक्षा जास्त धावाही फार कमी वेळा दिल्या होत्या. त्यामुळे हैदराबादविरुद्धची ही कामगिरी अनेकांसाठी आश्चर्यकारक ठरली. तरीही, या एका खराब सामन्यामुळे त्याच्या संपूर्ण हंगामातील कामगिरीवर परिणाम झालेला नाही. भुवनेश्वर कुमार अजूनही पर्पल कॅपच्या शर्यतीत आघाडीवर आहे. त्याने आतापर्यंत २४ विकेट्स घेतल्या असून, कागिसो रबाडा याच्याइतक्याच विकेट्स त्याच्या नावावर आहेत. मात्र, सरासरी आणि इतर आकडेवारीमुळे भुवनेश्वर सध्या अव्वल स्थानी कायम आहे.