वडील राजकारणी... लेक ठरतोय समाजसेवेचा गौरव!

    दिनांक :23-May-2026
Total Views |
गौरेश बकाने यांच्या संकल्पनेतून ‘वडद’ दत्तक ग्राम अभियान
 
देवळी, 
'Vadad' Adoption Village Campaign देवळी—विधानसभेतील वडद गावाला आदर्श, स्वच्छ, सक्षम आणि प्रगत गाव म्हणून विकसित करण्याच्या उद्देशाने युवा उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते गौरेश राजेश बकाने यांच्या संकल्पनेतून दत्तक ग्राम अभियानची घोषणा करण्यात आली आहे. २५ रोजी वडद येथे या अभियानाचा शुभारंभ होणार आहे. देवळीचे आमदार राजेश बकाने यांचे गौरेश चिरंजिव आहेत. वाढदिवसानिमित्त कोणताही व्यतिगत सत्कार, हार-तुरे किंवा दिखाऊ कार्यक्रम न करता गाव विकासासाठी सामूहिक संकल्प करण्याचे आवाहन गौरेश बकाने यांनी ग्रामस्थांना केले आहे. गावाचा विकास हा फत शासनाचा विषय नसून, तो प्रत्येक नागरिकाच्या सहभागातून घडणारा सामूहिक प्रवास आहे. वडद गावाला विकासाचा आदर्श नमुना बनविण्याचा निर्धार त्यांनी व्यत केला.
 
 
bakane
 
या अभियानांतर्गत गावातील प्रत्येक समस्येची नोंद व त्याचे तातडीने निराकरण, महिलांना सन्मान व संधी, युवकांना नवी दिशा तसेच पारदर्शक आणि उत्तरदायी कार्यपद्धती या प्रमुख बाबींवर विशेष भर देण्यात येणार आहे. अभियानाच्या माध्यमातून रस्त्यांचे सुशोभीकरण, सांडपाणी व्यवस्थापन, स्वच्छता मोहीम, कचरा व्यवस्थापन, वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धन यांसारख्या उपक्रमांद्वारे स्वच्छ आणि सुंदर वडद घडविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. आरोग्यदायी गाव या संकल्पनेतून मोफत आरोग्य तपासणी शिबिर, रतदान शिबिर, महिला व बाल आरोग्य जनजागृती अभियान यांचे आयोजन करण्यात येणार आहे. बचत गटांना प्रोत्साहन, रोजगार व व्यवसाय मार्गदर्शन, आर्थिक व आरोग्य साक्षरता यावर भर दिला जाणार आहे.
 

गौरेश बकाने  
 
'Vadad' Adoption Village Campaign  २५ रोजी ग्राम स्वच्छता अभियान, मोफत आरोग्य तपासणी शिबिर, रक्तदान शिबिर, युवक नोंदणी अभियान, महिला समूह बैठक, ग्रामसभा व समस्या नोंदणी, विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन तसेच गाव विकास संकल्प घोषणा यांचा समावेश राहणार आहे. १०० टक्के स्वच्छ गाव, १०० टक्के शालेय उपस्थिती, सक्षम महिला-सक्षम युवक, सुंदर रस्ते आणि हिरवे गाव, समृद्ध शेतकरी-समृद्ध गाव तसेच डिजिटल आणि पारदर्शक प्रशासन हे अभियानाचे मुख्य ध्येय निश्चित करण्यात आले आहे. गौरेश बकाने युवा उद्योजक असून आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त नीव प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संस्थापक आहेत. सामाजिक बांधिलकी जपत ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधण्याच्या उद्देशाने त्यांनी हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे.