मुंबई
Varun Dhawan, बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनय आणि दमदार स्क्रीन प्रेझेन्सच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता वरुण धवनआता हॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगू लागली आहे. सध्या सोशल मीडियावर आणि मनोरंजन विश्वात वरुणच्या एका आंतरराष्ट्रीय प्रोजेक्टबाबत मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू असून, यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
वरुण धवन एका हॉलिवूड अॅक्शन चित्रपटासाठी चर्चेत असून या चित्रपटाची निर्मिती प्रसिद्ध निर्माता लॉरेन्स कासानॉफ करणार असल्याचे सांगितले जात Varun Dhawan, आहे. ‘मॉर्टल कॉम्बॅट’सारख्या लोकप्रिय फ्रँचायझीशी संबंधित असलेल्या लॉरेन्स कॅसानॉफ यांच्यासोबत वरुणच्या चर्चांना वेग आला आहे. हा चित्रपट ‘इंटर-पॅरलल युनिव्हर्स’ या संकल्पनेवर आधारित अॅक्शनपट असणार आहे.