फरिदाबाद,
Volleyball Player Brutally Murdered प्रेमसंबंधांच्या संशयातून राजस्थानमधील एका तरुण व्हॉलीबॉल खेळाडूची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलीसोबत संबंध असल्याच्या रागातून मुलीच्या नातेवाईकांनी तरुणाचे अपहरण करून त्याला तब्बल तीन दिवस कैदेत ठेवत अमानुष मारहाण केल्याचा आरोप आहे. गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या या खेळाडूचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मृत तरुणाची ओळख राजस्थानातील भिवाडी परिसरातील सैदपूर गावातील रहिवासी मोनू (वय २१) अशी झाली आहे. तो राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धांमध्ये सहभागी होत अनेक पदके जिंकलेला खेळाडू होता. यावर्षी त्याने बारावीची परीक्षा सुमारे ७० टक्के गुणांसह उत्तीर्ण केल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. Volleyball Player Brutally Murdered मोनू आणि फरिदाबादमधील एका अल्पवयीन मुलीची ओळख काही काळापूर्वी झाली होती. मुलीचा मामा सैदपूर गावात राहत असल्याने दोघांची भेट होत गेली आणि त्यातून मैत्री निर्माण झाली होती. काही महिन्यांपूर्वी मुलीच्या बेपत्ता होण्याप्रकरणी मोनूविरोधात तिगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, नंतर मुलगी सापडल्यानंतरही या प्रकरणाचा तपास सुरू होता.
कुटुंबीयांच्या माहितीनुसार, १७ मे रोजी मोनू पोलीस ठाण्यात चौकशीसाठी जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडला होता. त्याचवेळी मुलीच्या नातेवाईकांनी त्याचे कथितरित्या अपहरण केले. त्यानंतर तीन दिवस त्याला एका घरात डांबून ठेवण्यात आले. या काळात त्याला उपाशी ठेवून वारंवार मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. अखेर गंभीर अवस्थेत त्याला अर्धनग्न अवस्थेत बाहेर फेकण्यात आल्याचेही कुटुंबीयांनी म्हटले आहे. Volleyball Player Brutally Murdered दरम्यान, पोलिसांकडून मोनू जखमी झाल्याची माहिती मिळाल्यानंतर कुटुंबीय रुग्णालयात पोहोचले. मात्र उपचार सुरू असतानाच शुक्रवारी त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. फरिदाबाद पोलिसांनी कुटुंबीयांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. या प्रकरणात दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.