प्रादेशिक वन, वन्यजीवच्या एसीएफची खांदेपालट

    दिनांक :23-May-2026
Total Views |
वर्धा, 
Wardha Forest Division राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाचे विशेष कार्यकारी अधिकारी उदय ढगे यांनी सहाय्यक वनसंरक्षक गट अ (कनिष्ठ श्रेणी) या संवर्गातील अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहे. या आदेशानुसार एका अधिकार्‍याची जिल्ह्याबाहेर बदली झाली असून जिल्ह्याला दोन नवीन अधिकारी मिळाले आहे.
 
 
tans
 
Wardha Forest Division  बुधवार २० मे रोजी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशानुसार जिल्ह्यातील बोर व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्राचे सहाय्यक वनसंरक्षक केतन बिरासरिस यांची बदली झाली असुन त्यांच्या जागी नागपूर येथील सहाय्यक वनसंरक्षक आशिष देशमुख यांची बदली करण्यात आली आहे. वर्धा प्रादेशिक वनविभागाला संबंधित बदली आदेशानुसार नवेगाव नागझीरा व्याघ्र प्रकल्प स्थित साकोली येथील वनसंरक्षक (विशेष व्याघ्र संरक्षण दल)चे ज्ञानेश्वर वाघ हे सहाय्यक वनसंरक्षक (वनीकरण, संरक्षण व अतिक्रमण निर्मुलन) हे नवीन अधिकारी मिळाले आहे.