नवी दिल्ली,
Jaishankar Rubio Meeting भारत आणि अमेरिका यांच्यातील सामरिक संबंधांना आणखी बळ देण्याच्या उद्देशाने परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांच्यात नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊसमध्ये महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या चर्चेत संरक्षण, व्यापार, ऊर्जा, आधुनिक तंत्रज्ञान तसेच जागतिक सुरक्षेशी संबंधित अनेक महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. भारत दौऱ्यावर आलेल्या रुबियो यांचा हा अमेरिकेचे परराष्ट्र सचिव म्हणून पहिलाच अधिकृत भारत दौरा मानला जात आहे.

बैठकीनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्तपणे माध्यमांशी संवाद साधताना दहशतवादाविरोधातील सहकार्य अधिक मजबूत करण्यावर भर दिला. भारत आणि अमेरिकेसमोर अनेक समान आव्हाने उभी असल्याचे सांगताना जयशंकर यांनी दहशतवाद हा दोन्ही देशांसाठी गंभीर धोका असल्याचे स्पष्ट केले. Jaishankar Rubio Meeting या क्षेत्रात दोन्ही देशांच्या सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणांमध्ये सातत्याने समन्वय वाढत असल्याचेही त्यांनी नमूद केले. या चर्चेदरम्यान पश्चिम आशियातील वाढता तणाव, आखाती प्रदेशातील घडामोडी आणि इराणसंबंधीचे प्रश्न हेही केंद्रस्थानी होते. दोन्ही देशांनी मध्यपूर्वेतील परिस्थितीवर सखोल चर्चा केली. अमेरिकेकडून इराणविषयी सुरू असलेल्या राजनैतिक हालचालींवरही चर्चा झाली असून इराणकडे अण्वस्त्रे नसावीत, ही अमेरिकेची भूमिका पुन्हा स्पष्ट करण्यात आली.
मार्को रुबियो यांनी अमेरिका आणि भारत हे केवळ मित्रदेश नसून मजबूत सामरिक भागीदार असल्याचे म्हटले. दोन्ही देशांमधील संबंध आधीपासूनच मजबूत असून त्यांना आणखी व्यापक करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. तर जयशंकर यांनी भारत-अमेरिका भागीदारीचा प्रभाव केवळ दोन देशांपुरता मर्यादित नसून जागतिक पातळीवर जाणवत असल्याचे स्पष्ट केले. या बैठकीकडे पाकिस्तानसाठीही एक स्पष्ट संदेश म्हणून पाहिले जात आहे. Jaishankar Rubio Meeting दहशतवादाविरोधातील कठोर भूमिका आणि सुरक्षाविषयक सहकार्य अधिक वाढवण्याच्या भूमिकेमुळे भारताला अमेरिकेचा ठाम पाठिंबा असल्याचे या चर्चेतून अधोरेखित झाले.