नैसर्गिक साधनसंपत्तीची सखोल माहिती संकलित
सेलू,
Protection of Forest Resources वर्धा जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असून तापमानाने तब्बल ४७ अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला आहे. अशा रखरखत्या उन्हातही प्रशासनाने कर्तव्याला प्राधान्य देत तालुयातील बोर व्याघ्र प्रकल्प २ मधील गरमसूर येथील पुनर्वसन क्षेत्रात विशेष सर्वेक्षण मोहिमेला सुरुवात केली आहे. पुनर्वसन प्रक्रियेत कोणतीही त्रुटी राहू नये तसेच गावातील नैसर्गिक संपत्तीची अचूक नोंद व्हावी, या उद्देशाने विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष गावात जाऊन पाहणी करीत आहेत.

या सर्वेक्षणामध्ये गावातील पिकांची स्थिती, फळझाडे, वनझाडे, शेतातील गोठे, विहिरी, बोअरवेल, सिंचन साधने तसेच इतर मालमत्तेची सविस्तर माहिती संकलित करण्यात येत आहे. प्रत्येक बाबीचा पंचनामा करून त्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केला जाणार आहे. त्यामुळे भविष्यातील पुनर्वसन प्रक्रियेत गावकर्यांना योग्य लाभ मिळण्यास मदत होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. Protection of Forest Resources उपविभागीय अधिकारी वर्धा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या मोहिमेत सदर सर्वेक्षणात गरमसूर येथील ग्राम महसूल अधिकारी सतीश बरवड, कृषी सहाय्यक अधिकारी पोकळे, वनरक्षक विष्णू कदम, पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी, भूमिअभिलेख विभागाचे कर्मचारी आणि कृषी विभागातील कर्मचार्यांनी प्रत्यक्ष क्षेत्रात जाऊन माहिती संकलनाचे काम हाती घेतले आहे.
रखरखत्या उन्हामुळे सामान्य नागरिक घराबाहेर पडणे टाळत असताना प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी मात्र आपली जबाबदारीची जाणीव ठेवून शेतशिवारात फिरून पाहणी करताना दिसत आहेत. शासनाच्या पुनर्वसन धोरणाला गती देण्यासाठी आणि प्रभावित नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी हे सर्वेक्षण महत्त्वाचे मानले जात आहे. Protection of Forest Resources स्थानिक नागरिकांनीही प्रशासनाच्या या उपक्रमाचे स्वागत केले असून, अचूक सर्वेक्षण झाल्यास भविष्यातील पुनर्वसन प्रक्रिया अधिक पारदर्शक व परिणामकारक होईल, अशी अपेक्षा व्यत केली जात आहे.