कान्स 2026 मध्ये ऐश्वर्या रायचा ग्लॅमरस जलवा

रेड कार्पेटवर ‘लेडी बॉस’ लुकची जोरदार चर्चा

    दिनांक :24-May-2026
Total Views |
कान्स
Aishwarya Rai जगप्रसिद्ध कान्स फिल्म फेस्टिव्हल 2026 मध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही ऐश्वर्या राय बच्चन आपल्या स्टायलिश आणि ग्लॅमरस उपस्थितीमुळे चर्चेच्या केंद्रस्थानी राहिली आहे. 12 मेपासून सुरू झालेल्या या प्रतिष्ठित सोहळ्यात तिच्या रेड कार्पेट लुक्सची चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता होती. पहिल्याच दिवशी सादर केलेल्या ‘जलपरी’ प्रेरित गाऊनमुळे सोशल मीडियावर तिच्या लुकने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. त्यानंतर क्लोजिंग सेरेमनीपर्यंत तिच्या प्रत्येक उपस्थितीची फॅशन वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.
 

Aishwarya Rai Cannes 2026 
फेस्टिव्हलच्या दुसऱ्या दिवशी ऐश्वर्या राय पांढऱ्या रंगाच्या आकर्षक पँटसूटमध्ये दिसली. फेदर आणि लेस डिटेलिंग असलेल्या या आउटफिटमुळे तिचा लुक अधिकच रॉयल आणि एलिगंट भासत होता. विशेषतः तिचा स्टायलिश ब्लेझर या संपूर्ण पेहरावाचा केंद्रबिंदू ठरला. ब्लेझरच्या लॅपल्सवर करण्यात आलेली मौल्यवान रत्नांची नक्षी आणि पंखांच्या डिझाइनमुळे या लुकला एक वेगळाच ग्लॅमरस टच मिळाला. तिच्या आत्मविश्वासपूर्ण उपस्थितीमुळे फॅशन समीक्षकांनी या लुकला ‘लेडी बॉस’ असा उल्लेख दिला असून सोशल मीडियावरही तिच्या फोटोंना मोठा प्रतिसाद मिळत आहे.हा लक्षवेधी आउटफिट प्रसिद्ध चिनी फॅशन डिझायनर चेनी चॅन यांनी डिझाइन केला आहे. ऐश्वर्याच्या व्यक्तिमत्त्वाला साजेशी अशी भव्यता आणि एलिगन्स या लुकमध्ये स्पष्ट दिसत असल्याची प्रतिक्रिया फॅशन क्षेत्रातून उमटत आहे.
 
 
याआधीही कान्सच्या उद्घाटन Aishwarya Rai  सोहळ्यात तिचा जलपरी-थीम गाऊन चर्चेचा विषय ठरला होता. भारतीय फॅशन डिझायनर अमित अग्रवाल यांनी तयार केलेल्या या गाऊनमध्ये तिचा एलिगंट आणि काल्पनिक सौंदर्याचा मिलाफ असलेला अंदाज पाहायला मिळाला होता. सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.
तसेच तिच्या आणखी एका पिंक गाऊन लुकनेही चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. या प्रसंगी तिच्यासोबत मुलगी आराध्या बच्चनही उपस्थित होती. आई-मुलीची ही जोडी रेड कार्पेटवर आकर्षणाचे केंद्र ठरली. दोघींच्या सहज आणि स्टायलिश उपस्थितीने चाहत्यांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला असून त्यांच्या नात्याचे आणि बॉन्डिंगचेही मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.एकूणच, कान्स 2026 मध्ये ऐश्वर्या राय बच्चनने पुन्हा एकदा आपल्या फॅशन सेन्स, आत्मविश्वास आणि ग्लॅमरस उपस्थितीने जागतिक स्तरावर लक्ष वेधून घेतले आहे.