- विहींपचे तहसीलदारांना निवेदन
आमगाव,
Bakri Eid Festival: Cow Slaughter आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गोवंशाची खरेदी-विक्री आणि छुप्या पद्धतीने गोवंश हत्या करण्याचे प्रकार घडण्याची शक्यता आहे. तेव्हा प्रशासनाने याकडे विशेष लक्ष देऊ हे प्रकार घडू नये व गोहत्या होणार नाही याची काळजी घ्यावी अशी मागणी येथील विश्व हिंदू परीषद व बजरंग दल शाखेच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात स्थानिक तहसीलदार व ठाणेदार यांना 21 मे रोजी निवेदनही सादर करण्यात आले आहे.
Bakri Eid Festival: Cow Slaughter येथील बजरंग दल व विहिंपच्या पदाधिकार्यांनी स्थानिक पोलिस निरीक्षक व तहसीलदारांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. सादर निवेदनानुसार भारतीय शेती, अर्थव्यवस्था, पर्यावरण आणि संस्कृतीचा कणा असलेल्या गोवंशाची हत्या मोठ्या प्रमाणावर सुरू असणे अत्यंत गंभीर बाब असून, हे कृत्य कायदा व सामाजिक सविस्तरतेच्या पूर्णपणे विरोधात आहे. महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 (सुधारित 1995) आणि प्राण्यांमधील क्रूरता प्रतिबंधक अधिनियम 1960 नुसार संपूर्ण गोवंश हत्याबंदी लागू आहे. सर्वोच्य न्यायालयानेही गोवंश संरक्षण हे सार्वजनिक हितासाठी असल्याचे स्पष्ट केले आहे. असे असतानाही, काही समाजकंटकांकडून जाणीवपूर्वक सामाजिक सलोखा बिघडवण्याचे आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. या संवेदनशील विषयाकडे प्रशासनाने केवळ गृहकृत्य म्हणून न पाहता संवेदनशील सुरक्षा विषय म्हणून पाहावे. अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी प्रांत संयोजक नवीन जैन सिंघल, जिल्हा गोरक्षा प्रमुख बालाराम व्यास, प्रखंड प्रमुख प्रणय मेश्राम, नगर अध्यक्ष राजेश मिश्रा, पंकज पारधी, भैरव ढेकवार, राजु बावनथडे, पंकज पारधी, गौरव पवार, आयुष बेटवाल, कोमल पवार, गुडू टेंभरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.