दुचाकी शिरली कंटेनरमध्ये, दोन गंभीर

    दिनांक :24-May-2026
Total Views |
कलोडे चौकातील घटना
 
हिंगणघाट, 
Bike-Container Accident शहरातील कलोडे चौकात दुचाकी थेट कंटेनरखाली घुसल्याने दुचाकी चालक दोघे गंभीर जखमी झाले. विजय उत्तम साधा (२६) व लल्लन सिहारन यादव (४०) अशी गंभीर जखमीची नावे आहे. ही घटना शनिवार २३ रोजी घडली. विजय साधा हा हिंगणघाट एमआयडीसी परिसरातील साईकृपा जिनिंगमध्ये मजुरीचे काम करतो तर लल्लन यादव हा त्याच जिनिंगमध्ये हमाली ठेकेदार म्हणून कार्यरत आहे. दोघेही दुचाकीने जात असताना कलोडे चौकात हा अपघात घडला.
 

acc 
 
Bike-Container Accident अपघातात दोघांच्या पायांना गंभीर दुखापत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच हिंगणघाट पोलिसांच्या ११२ पथकातील प्रमोद डडमल हे आपल्या सहकार्‍यांसह घटनास्थळी दाखल झाले. जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर प्रकृती गंभीर असल्याने दोघांनाही सेवाग‘ाम येथील कस्तुरबा रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हिंगणघाट पोलिस ठाण्याचे प्रभारी अनिल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.