ढगा, गारपीट परिसरात वाघिणींचा सहा पिलांसह संचार

    दिनांक :24-May-2026
Total Views |
पर्यटकांना दर्शन
वर्धा, 
Bor Tiger Reserve बोर व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात येणार्‍या आणि बांगडापूर वनपरिक्षेत्राचा भाग असलेल्या ढगा व गारपीट भागात सध्या प्रत्येकी ३ पिलांसह बीटीआर-१३ आणि बीटीआर-१६ या दोन वाघिणींचे दर्शन जंगल सफारीदरम्यान पर्यटकांना होत आहे. या दोन वाघिणींशिवाय बीटीआर-१९ हा वाघोबाचेही दर्शन होत आहे.
 
 
tiger
 
Bor Tiger Reserve  बोर व्याघ‘ प्रकल्पाच्या ढगा गेटने प्रवेश करून बफर जंगल सफारीचा आनंद लुटताना काही पर्यटकांना मध्यंतरी एका कृत्रिम पानवठ्यावर जलक‘ीडा करताना वाघिणीचे तीन पिलांसह दर्शन झाले होते. काही दिवसानंतर बीटीआर-१३ वाघिणीचे तीन पिलांसह नीलगायची शिकार करताना दर्शन झाले होते. जंगलातील विविध भागात असलेले ट्रॅप कॅमेरे व या दोन्ही घटनेचे फोटो आणि व्हिडीओचे वन्यजीव विभागाच्या काही अधिकार्‍यांनी निरीक्षण केले असता बीटीआर-१३ व बीटीआर-१६ या वाघिणींचा प्रत्येकी ३ बछड्यांसह ढगा व गारपीट भागात अधिवास असुन बीटीआर-१९ हा वाघाचा वावरही असल्याचे पुढे आले आहे. बोरच्या कोअर क्षेत्राप्रमाणेच आता बफर क्षेत्रातही वाघीण ३-३ पिलांना जन्म देत असल्याने बोरचे बफर क्षेत्रही वाघांच्या संवर्धनासाठी उपयुत ठरत आहे.