आजनादेवी येथे जनावरांची पाण्यासाठी भटकंती
कारंजा (घा.),
Commercial Dairy Farmer तालुयातील आजनादेवी येथे जनावरांची सं‘या जवळपास ६०० च्या वर आहे. शेतीला जोडधंदा म्हणून दुधाचा व्यवसाय चालतो. परंतु, सध्याची परिस्थिती येथे गंभीर बनलेली आहे. जनावरांना पिण्यासाठी पाणीच नसल्याने पशुपालकांनी जनावरांसह गाव सोडण्याचा सामूहिक निर्णय घेतल्याचे समजते. जनावरांसाठी लघु सिंचन कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी पशुपालकांंनी केली. परंतु, अधिकार्यांना मुया प्राण्यांविषयी पाझर फुटला नाही.
आजनादेवी येथे जनावराच्या पिण्याच्या पाण्याची अत्यंत गंभीर समस्या निर्माण झाली असल्याने आजनादेवी येथील तलावाचे पाणी नाल्यांनी सोडल्यास ते जनावरांना पिण्याची व्यवस्था होऊ शकते. मात्र, सिंचन विभागातील अधिकार्यांच्या दुर्लक्षामुळे आजनादेवी येथील जनावरांना भर उन्हात जवळपास तीन ते चार किलोमीटर पिण्याच्या पाण्यासाठी न्यावे लागते. पाण्यासाठी पाझर तलावावर गेल्यावर अनेक जनावरं त्या ठिकाणी दलदलीची जमीन असल्यामुळे मातीमध्ये अडकून काही जनावरे मृत्युमुखी पडत आहे. मात्र, अजूनपर्यंत गोधनाच्या पाण्याची समस्या सुटलेली नाही. त्यामुळे आजनादेवी येथील दुग्ध व्यवसाय करणार्या शेतकर्यांना गाव सोडण्याची वेळ आलेली आहे. वरिष्ठ अधिकार्यांनी याकडे लक्ष देऊन येथील पाझर तलावाचे पाणी तेथील लागून असलेल्या नाल्यामध्ये सोडावे. त्यामुळे जंगलातील प्राणी, पशुपक्षी, जनावरांची पाण्याची समस्या सुटू शकते. लागून असलेली खडक नदी कोरडी झालेली आहे. सिंचन विभागाने पाणी सोडले तर आजनादेवी येथील जनावरासोबत शेतकर्यांचे स्थलांतर थांबू शकते. अन्यथा बर्याच प्रमाणात जनावराचा मृत्यू पिण्याच्या पाण्यामुळे होऊ शकतो. संबंधित अधिकार्यांनी याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर येथील सिंचन तलावाचे पाणी नाल्यांमध्ये सोडून ही समस्या मार्गी लावावी अशी पशुपालकांनी मागणी केली आहे.
Commercial Dairy Farmer जनावरांना लागणार्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. परिसरात दुग्ध व्यवसाय करणारी शेतकरी येथे मोठ्या प्रमाणात आहेत. परिसरात पूर्णपणे पाणीसाठा संपलेला आहे. गावापासून जवळपास तीन किलोमीटर अंतरावर पाझर तलाव आहे. लघु सिंचन विभागाला याबाबत पत्रव्यवहार करून जनावरासाठी पाणी नाल्यामध्ये सोडण्याची मागणी केली. ती समस्या सुटली नसल्याने गावातील शेतकर्यांना गाव सोडण्याची वेळ आलेली आहे. संबंधित अधिकार्यांनी याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर येथील पाझर तलावाचे पाणी नाल्यामध्ये सोडावे अशी मागणी माजी उपसरपंच राजू गुळघाणे यांनी केली आहे.