आर्णी तालुक्यात 54 हजार हेक्टरवर नियोजन

    दिनांक :24-May-2026
Total Views |
कापसालाच शेतकऱ्यांची पसंती

आर्णी, 
Cotton Farmers आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर आर्णी तालुक्यात शेतशिवारात सध्या लगबगीचे वातावरण पाहायला मिळत आहे. यंदा तालुक्याला 54 हजार 67 हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. कापूस मागीलवर्षी 27,520 हेक्टरमध्ये होता.त्यात या वर्षी वाढ होऊन 29,100 हेक्टर होईल. सोयाबीन मागील वर्षात 18,503 हेक्टर होते, तर यावर्षी बहुतेक कमी होईल अंदाजे 17400 हेक्टरवर पेरणी होईल.
 
 
Cotton Farmers
 
Cotton Farmers  तसेच तूर 6510 हेक्टर, ज्वारी 65 हेक्टर, मूग 35 हेक्टर, उडीद 15 हेक्टर, ऊस 656 हेक्टर, भाजीपाला 140 हेक्टर, तर इतर पिके 152 हेक्टर असे एकूण 54,067 हेक्टरमध्ये यावर्षी असे खरिपाचे नियोजन आहे. सोयाबीन व तूर या प्रमुख पिकांकडे शेतकèयांचा मोठा कल दिसून येत आहे. तापमानाचा पारा 42 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला असल्याने शेतकरी पहाटेपासून शेतात मशागतीच्या कामात व्यस्त आहेत. अनेक ठिकाणी ट्रॅक्टरच्या साहाय्याने नांगरणी, वखरणी, ढेकळं फोडणीची कामे सुरू असून काही भागात बैलजोडीच्या मदतीने पारंपरिक पद्धतीने मशागत केली जात आहे.
शेतकऱ्यांनी फळबाग योजनांचा लाभ घ्यावा : आनंद बदखल
शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन दर्जेदार बियाण्यांची निवड करावी. तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना व पोखरा गावांसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत फळबाग लागवडीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी आनंद बदखल यांनी केले आहे.