*पालकांवर होणार कारवाई
*ग्रामसभेत मतदान, विविध ठरावांवर चर्चा
तळेगाव (श्या.पं.),
कॉन्व्हेंटचे जाळे गावखेड्यात पसरल्या गेले. सर्वसामान्य माणसांनी आपलाही पाल्य स्पर्धेत टिकावा म्हणून मराठी शाळा सोडून कॉन्व्हेंट संस्कृतीकडे वळला. त्यामुळे District Council Schools जिल्हा परिषदांच्या शाळा ओस पडू लागल्या आहेत. अशातच आष्टी तालुयातील लहान आर्वी ग्रामपंचायतीने ग्रामसभेत महत्त्वपूर्ण निर्णय घेत गावातील शाळा सोडून शहरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यास पालकांवर कारवाई करण्याचा सामूहिक निर्णय घेतला. त्यासाठी येथे मतदानही घेण्यात आले. गावातील शाळेत गावचा मुलगा, मुलगी शिकत नसेल तर शासकीय योजनांचा लाभ मिळणार नसल्याची तंबीच पालकांना देण्यात आली.
लहान आर्वी ग्रापंची ग्रामसभा सरपंच सुनील साबळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. लहान आर्वी आणि लिंगापूर येथील शाळा बंद पडू नये याकरिता गावातील नर्सरी, केजी-वन ते दहाव्या वर्गापर्यंत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी तालुयाच्या ठिकाणी शिक्षणासाठी जाऊ नये तसेच दोन्ही गावातील जि. प. शाळा आणि संत गजानन महाराज विद्यालयातील कमी होत चाललेली पटसं‘या यावर चर्चा केली. यामध्ये सुचक म्हणून नीलिमा देशमुख यांनी चर्चा केली तर रविंद्र आकोलकर यांनी त्यांच्या चर्चेला अनुमोदन दिले. ज्या पालकांची मुलं तालुयाला शिक्षणासाठी जात आहे त्या पालकांचा शासकीय लाभ बंद करण्यात यावा यावर मतदान घेण्यात आले. ग्रामसभेत ९५ गावकर्यांनी भाग घेतला. ४१ सदस्यांनी पालकांचा शासकीय लाभ बंद करण्यात यावे तर ६ मतदार सदस्यांनी उभे राहुन पालकांचा लाभ बंद करण्यात येऊ नये असे मत नोंदवले. ४८ सदस्य तटस्थ भूमिकेत राहिले. ग्रामसभेतील बहुसं‘य मतदार सदस्यांनी स्थानिक शाळा टिकवण्यासाठी सकारात्मक मत नोंदवले. विद्यार्थ्यांना गावातच दर्जेदार शिक्षण मिळावे, शाळांची गुणवत्ता वाढवावी आणि पालकांनीही मुलांना स्थानिक शाळेतच प्रवेश द्यावा, असे आवाहन शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष नीलिमा देशमुख यांनी केले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांनी सुद्धा गावातील शिक्षण टिकवण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचा निर्धार व्यत केला.
District Council Schools याशिवाय माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान, महिलांना लाडकी बहीण योजनेचे अनुदान सुरू करणे, उत्पन्न वाढीसाठी विविध कर लावणे, आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी उपसरपंच अमोल होले, सदस्य सागर नागापुरे, कांता इंगोले, भाग्यश्री निंभोरकर, ग्रापं अधिकारी अनुराधा धारपुरे, महसूल विभागाचे तलाठी अक्षय चोरे, विकी बोथलिंगे, पोलिस पाटील देवानंद पाटील, विक‘म निंभोरकर, मुख्याध्यापक तारा राठोड, लिंगापूरचे मुख्याध्यापक शरद बाबरे, आदी उपस्थित होते.