नागपूर,
Dr. Arun Bhagwant Pawar नागपूर येथील डॉ. अरुण भगवंत पवार (डेप्युटी डायरेक्टर, पशुसंवर्धन विभाग) यांचे वृद्धापकाळाने वयाच्या ८७ व्या वर्षी शनिवारी, २३ मे २०२६ रोजी सायंकाळी ८.३० वाजता निधन झाले. ते मानव सेवा नगर, सेमिनरी हिल्स, नागपूर येथे वास्तव्यास होते.
त्यांचा अंतिम संस्कार फ्रेंड्स कॉलनी, शिवाजी चौक येथील मोक्षधाम येथे पार पडला. त्यांच्या पश्चात कुटुंबीय, आप्तेष्ट आणि मोठा मित्रपरिवार आहे. त्यांच्या अस्थींचे विसर्जन सोमवार, ०१ जून रोजी श्री गुरुदेव मानव मंदिर अस्थिकुंड, येरला येथे करण्यात येणार आहे. त्यांच्या निधनाने पशुसंवर्धन क्षेत्रासह सामाजिक वर्तुळात शोककळा पसरली आहे. Dr. Arun Bhagwant Pawar त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, अशी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.