आता ईडी करणार ‘नीट’ चौकशी

मोटेगावकरांच्या संपत्तीची चौकशी सुरू

    दिनांक :24-May-2026
Total Views |
पुणे/नवी दिल्ली
NEET-UG paper leak नीट-यूजी पेपरफुटी प्रकरणात आता अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) उडी घेतली असून घोटाळ्यातील पैशांचा मागोवा आणि आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू केली आहे. सीबीआयनंतर आता ईडीने आरसीसी क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर याच्या मालमत्तेसह बँक व्यवहार आणि गुंतवणुकीची तपासणी सुरू केली आहे.
 
neet motegaokar
 
NEET-UG paper leak ईडीने मोटेगावकर यांच्या मालमत्ता नोंदी, महसूल कागदपत्रे आणि व्यवहारांची माहिती मागवली आहे. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, नीट आणि जेईई कोचिंग व्यवसाय, कथित पेपर विक्री आणि गुंतवणुकीतून मोटेगावकरने मोठी संपत्ती उभी केल्याचा संशय आहे.
 
NEET-UG paper leak लातूर, नाशिक, नांदेड, पुणे तसेच अन्य महानगरांमध्ये मोटेगावकरने भूखंड, इमारती आणि मंगल कार्यालय खरेदी केल्याची माहिती तपासात समोर आली आहे. मोटेगावकर याने 2023 मध्ये पुण्यातील वारजे परिसरातील मोक्याच्या ठिकाणी सुमारे 51 गुंठे जमीन खरेदी केली होती. या जमिनीची सध्याची बाजारभावानुसार किंमत तब्बल 30 ते 40 कोटी रुपयांच्या दरम्यान असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
 
NEET-UG paper leak ईडीने मोटेगावकर आणि त्याच्या नातेवाईकांच्या बँक खात्यांचीही तपासणी सुरू केली आहे. ‘गेस पेपर’ मिळविण्यासाठी पालकांकडून किती रक्कम घेण्यात आली, याचाही तपास सुरू आहे.