अमेरिकेत ग्रीन कार्ड धारकांना प्रवेशबंदी

    दिनांक :24-May-2026
Total Views |
वॉशिंग्टन
Green Card Holders काँगो आणि युगांडामध्ये वेगाने पसरणारा इबोला विषाणू अमेरिकेत पोहोचला आहे. इबोलाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अमेरिकेने ग्रीन कार्ड धारकांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. यापूर्वी, अमेरिकन नागरिक आणि ग्रीन कार्ड धारकांना ३० दिवसांच्या इबोला बंदीतून सूट दिली होती, परंतु शुक्रवारी ग्रीन कार्ड धारकांचाही त्यात समावेश करण्यात आला.
 
us ebola
 
Green Card Holders अमेरिकेच्या रोग नियंत्रण केंद्राने सांगितले की, विषाणूचा देशात प्रवेश रोखण्यासाठी ग्रीन कार्ड धारकांवरील बंदी आवश्यक होती. अमेरिकेच्या सार्वजनिक आरोग्य कायद्याच्या कलम ४२ अंतर्गत ही प्रवेशबंदी लागू केली आहे. हा कायदा संघीय आरोग्य अधिकाèयांना साथीचा रोग पसरण्यापासून रोखण्यासाठी स्थलांतरितांना देशात प्रवेश करण्यापासून रोखण्याचा अधिकार देतो.
 
Green Card Holders  दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) काँगोमधील इबोलाच्या बुंदीबुग्यो प्रकाराच्या वेगाने होणाèया प्रसारामुळे त्याच्या धोक्याचे मूल्यांकन अति उच्च श्रेणीत वाढवले आहे. डब्ल्यूएचओने याला आंतरराष्ट्रीय चिंतेची आणीबाणी म्हणून घोषित केले आहे.