राष्ट्रीय महामार्गावर धावत्या ट्रकच्या कॅबिनला आग

युवकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला

    दिनांक :24-May-2026
Total Views |
हिंगणघाट,
National Highway राष्ट्रीय महामार्ग ४४ वर असलेल्या कलोडे चौकात शनिवार २३ रोजी सायंकाळच्या सुमारास धावत्या ट्रकच्या कॅबिनने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. मात्र, युवकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेत ट्रकच्या कॅबिनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.
 
 
National Highway
 
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीहून चेन्नईच्या दिशेने ए. पी. ३९ यू. एन. ७५९९ क्रमांकाचा ट्रक बटाटे घेऊन जात होता. स्थानिक कलोडे चौकातून जात असताना अचानक ट्रकच्या कॅबिनमधून धूर निघू लागला आणि काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले. ही घटना घडताच परिसरातील सतर्क युवकांनी धाव घेत तातडीने मदतीला सुरुवात केली. युवकांच्या या धाडसी प्रयत्नांमुळे आग पसरण्यापासून रोखली गेली. National Highway मात्र, आगीची तिव्रता मोठी असल्याने ट्रकच्या कॅबिनचे मोठे नुकसान झाले. आग विझवताना ट्रकचा चालक किरकोळ जखमी झाला. ट्रकच्या वायरिंगमधील बिघाडामुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यत करण्यात येत आहे. महामार्गावर झालेल्या या घटनेमुळे काही काळ वाहतुकीचा जाम लागला होता. परंतु, पोलिसांच्या मदतीमुळे परिस्थिती लवकरच नियंत्रणात आली. घटनास्थळी हिंगणघाट नगर परिषदेचे अग्निशमन दल दाखल झाले होते.