विश्वकर्मा मंदिरासाठी 50 लाखांचा निधी मंजूर

    दिनांक :24-May-2026
Total Views |
पुसद, 
Funds Approved for Vishwakarma Temple महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पुसद येथील धनकेश्वर परिसरातील प्रभू विश्वकर्मा मंदिरात सभागृह, सुशोभीकरण, रोषणाई, भक्तनिवास तसेच पायवाटा बांधण्यासाठी 50 लाख रुपयांच्या निधीस मंजुरी देण्यात आली आहे. या कामांचा भूमिपूजन सोहळा शुक्रवार, 22 मे रोजी साध्या पद्धतीने पार पडला. राज्यमंत्री इंद्रनील नाईक आणि पुसद नगर परिषद अध्यक्ष मोहिनी नाईक यांच्या प्रयत्नांतून धनकेश्वर येथील विश्वकर्मा भगवान मंदिर संस्थेला हा निधी मंजूर झाल्याचे सांगण्यात आले. यामुळे विश्वकर्मा समाजाला दिलेले आश्वासन पूर्ण झाल्याची भावना समाजबांधवांनी व्यक्त केली.
 
 

Vishwakarma Temple
 
Funds Approved for Vishwakarma Temple विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या आचारसंहितेमुळे राज्यमंत्री इंद्रनील नाईक आणि मोहिनी नाईक हे भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र, विश्वकर्मा समाजाच्या सदस्यांनी कोणताही गाजावाजा न करता भूमिपूजन सोहळा पार पाडत त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. या प्रसंगी मदनलाल जांगीड, ओम जांगीड, हरिप्रसाद विश्वकर्मा, राधेश्याम जांगीड, भगीरथ जांगीड, देवराम, प्रल्हाद, मदन, नीलेश अग्रवाल, संतोष बजाज तसेच ठेकेदार आनंद जांगीड आदी उपस्थित होते. त्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी विश्वकर्मा समाजातील अनेक नागरिक उपस्थित होते.