आ. बाबुराव कदम यांच्या पाठपुराव्याला यश
विहिरी खचलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा
हदगाव,
Funds for Farmers Affected by Excessive Rainfall मागील वर्षी 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे हदगाव, हिमायतनगर तालुक्यातील अनेक शेतकèयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. विशेषतः शेतातील सिंचन विहिरी खचणे, बुजणे व शेतोपयोगी संरचनांचे नुकसान होणे यामुळे शेतकरी अडचणीत सापडले होते. या शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळण्यासाठी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करणारे आमदार बाबुराव कदम यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले. हदगाव पंचायत समिती अंतर्गत 232 लाभार्थ्यांना एकूण 22 लाख 40 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
हा निधी गटविकास अधिकाèयांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला असून संबंधित लाभार्थ्यांना टप्प्याटप्प्याने मदत वितरित करण्यात येणार आहे. शासनाच्या या विशेष मदत योजनेत पात्र लाभार्थ्यांना प्रथम टप्प्यात 15 हजार रुपये अग्रीम देण्यात येणार आहेत. त्यानंतर आवश्यक करार व इतर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उर्वरित 15 हजार रुपये लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहेत.
Funds for Farmers Affected by Excessive Rainfall हिमायतनगर तालुक्यासाठी देखील 99 हजार 243 रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून त्या तालुक्यातील बाधित शेतकèयांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना काही प्रमाणात आर्थिक आधार मिळणार असल्याचे समाधान आहे. शेतकèयांच्या समस्या शासन दरबारी प्रभावीपणे मांडत त्यांना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी आमदार बाबुराव कदम यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या पाठपुराव्यामुळेच हा निधी मंजूर झाल्याची भावना अनेक शेतकरी व्यक्त करत आहेत. दरम्यान, पात्र लाभार्थ्यांनी हदगाव व हिमायतनगर पंचायत समिती येथे आवश्यक कागदपत्रांसह संपर्क साधून शासनाच्या या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.