पोतराज ईश्वर राठोड ठरले आकर्षणाचा केंद्रबिंदू
दारव्हा,
Half-naked Bhandara movement दारव्हा पंचायत समितीच्या कारभारामुळे आणि प्रभारी अधिकाèयांच्या मनमानीमुळे नागरिकांनी अर्धनग्न आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथून करण्यात आली. आंदोलनाचा मोर्चा बसस्थानकमार्गे यू-टर्न घेत गोळीबार चौकातून तहसील कार्यालयावर धडकला. यावेळी तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
Half-naked Bhandara movement त्यानंतर आंदोलक पंचायत समिती कार्यालयात पोहोचले आणि प्रशासनाकडून कारवाई न झालेल्या तक्रारींचे ध्वनीक्षेपकावर जाहीर वाचन करण्यात आले. आंदोलनाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे प्रशासनाचा तीव्र निषेध करण्यासाठी ईश्वर राठोड हे स्वतः ‘पोतराज’ बनून आंदोलनात सहभागी झाले होते. हातामध्ये भंडारा घेऊन त्यांनी पंचायत समितीच्या कारभारावर प्रश्न विचारले. या आंदोलनात लाला पांडे, रणजित झोंबाडे, प्रफुल्ल राठोड, विशाल चव्हाण, विनोद जाधव, रवी शेंडे, संदीप गुल्हाने, इंगोले यांच्यासह अनेक तक्रारकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.