पुढील 24 ते 48 तास महत्त्वाचे... वीजसंकट गडद

    दिनांक :24-May-2026
Total Views |
मुंबई
Maharashtra power crisis राज्यात वाढलेल्या उन्हाच्या कडाक्यात वीजपुरवठ्यावर गंभीर संकट निर्माण झाले असून महानिर्मितीचे सहा औष्णिक वीज निर्मिती संच तांत्रिक बिघाडामुळे बंद पडल्याने राज्यातील वीज पुरवठ्यात मोठी घट झाली आहे. सुमारे 1500 ते 1700 मेगावॉट विजेचा तुटवडा निर्माण झाल्याने संपूर्ण वीज व्यवस्थेवर ताण आला आहे.
 

Maharashtra power crisis, Maharashtra electricity shortage 2026, 
विदर्भातील चंद्रपूर, कोराडी आणि खापरखेडा येथील वीज निर्मिती केंद्रांमधील संचांमध्ये एकापाठोपाठ तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. वाढत्या तापमानामुळे यंत्रणांवर आलेला प्रचंड ताण आणि कोळशाच्या पुरवठ्यातील अडचणी यामुळे हे संच बंद पडल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त केले जात आहेत.राज्यात सध्या विजेची मागणी सुमारे अठ्ठावीस हजार मेगावॉटच्या पुढे गेली असून मागणी आणि पुरवठा यामध्ये मोठी तफावत निर्माण झाली आहे. त्यामुळे काही भागांत वीज कपात करण्याची वेळ वीज वितरण कंपनीवर आली आहे.नागपूरसह विदर्भातील अनेक भागांत नागरिकांना वीज खंडित होण्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. Maharashtra power crisis प्रचंड उष्णतेमुळे परिस्थिती अधिकच गंभीर झाली असून दिवसा तसेच रात्रीही वीज पुरवठा खंडित होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.वीज यंत्रणेकडून बंद पडलेले संच पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. पुढील चोवीस ते अठ्ठेचाळीस तासांत परिस्थिती सुधारण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तोपर्यंत नागरिकांनी वीज वापर काटकसरीने करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.