मुंबई
Nautapa उत्तर भारतात उन्हाळ्यात उष्मा असह्य होत असताना सुरू होतो नऊ दिवसांचा भयंकर काळ. ’ नवतपा ’ म्हणून ओळखला जाणाऱ्या या कालावधीत वर्षभरातील सर्वात उष्ण नऊ दिवस अनुभवायला मिळतात. उत्तर भारतात सूर्याचा दाह वाढत असताना ’नवतपा’मुळे नागरिकांचे हाल होणार आहेत. यंदा 25 मे ते 2 जूनदरम्यान उत्तर भारतात नौतपा असेल.
Nautapa राजस्थानमधील लोककथांमध्ये ‘नवतपा’चा अर्थ लपलेला आहे. हिंदू पंचांगानुसार, जेव्हा सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो, तेव्हा ‘नवतपा’ची सुरुवात होते. यावेळी रोहिणी नक्षत्र सूर्याच्या अगदी जवळ पोहोचतं. या काळात सूर्याची किरणं पृथ्वीवर लंबवत पडतात. त्यामुळे भूभागाचे तापमान वाढते. जमिनीतील ओलसरपणा आणि गारवा सूर्य शोषुन घेतो आणि त्यामुळे उष्मा असह्य होतो. या संकल्पनेचा उगम जरी राजस्थानात झाला असला तरी याचा परिणाम उत्तर भारतातील पंजाब, हरियाणा, नवी दिल्ली, उत्तर प्रदेशसारख्या राज्यात सर्वाधिक जाणवतो.
Nautapa उत्तर भारतात उन्हाळ्यात उष्मा असह्य होत असताना सुरू होतो नऊ दिवसांचा भयंकर काळ. ’ नवतपा ’ म्हणून ओळखला जाणाऱ्या या कालावधीत वर्षभरातील सर्वात उष्ण नऊ दिवस अनुभवायला मिळतात. उत्तर भारतात सूर्याचा दाह वाढत असताना ’नवतपा’मुळे नागरिकांचे हाल होणार आहेत. यंदा 25 मे ते 2 जूनदरम्यान उत्तर भारतात नौतपा असेल.
Nautapa ज्योतिषीय गणितानुसार यंदा 25 मे रोजी दुपारी 3 वाजून 25 मिनिटांना हा नवतपा सुरू होणार आहे. त्यानंतर 30 ते 31 मेदरम्यान वादळी उष्ण वाऱ्यांमुळे ही स्थिती वाढणार आहे. त्यानंतर 2 जूनपर्यंत ही स्थिती कायम राहण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे, भारतीय हवामान विभागाचा यावर्षीचा अंदाजही नवतपाजवळच आहे. त्यानुसार पुढील 15 दिवस पंजाब, हरियाणा, नवी दिल्ली आणि राजधानीतील इतर भागांमध्ये तीव्र उष्णता आणि कोरडं वातावरण राहील. दिवसाचा पारा तर 40 ते 44 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
Nautapa मान्सूनपूर्व उष्णता
दरम्यान, मध्य भारतातही पारा 42 ते 46 अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याची शक्यता आहे. त्यासह नवतपामध्ये रात्रीही दिलासा मिळत नसून उकाडा कायम राहतो. भारतीय हवामान विभाग नवतपाचे अधिकृतपणे समर्थन करत नसले तरी अनेकदा हा काळ मान्सूनपूर्व उष्णतेदरम्यानच सुरू होतो.