कोलकाता,
MPs Launch Direct Attack on Police पश्चिम बंगालमधील बदललेल्या राजकीय परिस्थितीत तृणमूल काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि लोकसभेतील मुख्य प्रतोद कल्याण बॅनर्जी यांनी राज्य पोलिसांना थेट इशारा दिल्याने राजकीय वातावरण तापले आहे. कोणत्याही राजकीय दबावाखाली न येता निष्पक्षपणे काम करण्याचे आवाहन त्यांनी पोलिसांना केले. विशेषतः मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांच्या प्रभावाखाली काम करू नये, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.
समाजमाध्यमावर केलेल्या एका पोस्टमध्ये कल्याण बॅनर्जी यांनी पोलिसांनी संविधान आणि कायद्याशी प्रामाणिक राहावे, अशी भूमिका मांडली. MPs Launch Direct Attack on Police कोणत्याही पक्षीय विचारसरणीचा प्रभाव न घेता नागरिकांची सेवा करणे हेच पोलिसांचे खरे कर्तव्य असल्याचे त्यांनी नमूद केले. स्वतः एका पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा असल्यामुळे पोलिसांबद्दल आपल्याला विशेष आदर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, तृणमूल काँग्रेसमध्ये अंतर्गत हालचालींनाही वेग आला आहे. पक्षप्रमुख ममता बॅनर्जी यांनी अलीकडेच लोकसभेतील मुख्य प्रतोद पदावरून काकोली घोष दस्तीदार यांना हटवत पुन्हा कल्याण बॅनर्जी यांच्यावर विश्वास दाखवला. या निर्णयानंतर काकोली घोष यांनी समाजमाध्यमावर अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली होती. MPs Launch Direct Attack on Police चार दशकांच्या निष्ठेचे असे फळ मिळाल्याचे सूचक वक्तव्य त्यांनी केले होते, ज्यामुळे पक्षात चर्चांना उधाण आले.
यानंतर केंद्र सरकारने काकोली घोष यांच्या सुरक्षेत वाढ करत त्यांना ‘वाय-प्लस’ सुरक्षा प्रदान केली आहे. तृणमूल काँग्रेसच्या काही नेत्यांच्या सुरक्षेत कपात झाल्याच्या चर्चांदरम्यान हा निर्णय घेण्यात आल्याने त्याकडे विशेष लक्ष वेधले जात आहे. विधानसभा निवडणुकीत पराभवानंतर तृणमूल काँग्रेसकडून राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. MPs Launch Direct Attack on Police ममता बॅनर्जी यांनीही निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचाराच्या घटनांमध्ये पोलिसांनी निष्क्रिय भूमिका घेतल्याचा आरोप केला होता. कलकत्ता उच्च न्यायालयात उपस्थित राहत त्यांनी पश्चिम बंगाल हे ‘बुलडोझर राज्य’ नसल्याचेही स्पष्ट केले होते. राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांमुळे तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होत असल्याचे चित्र दिसत आहे.