- ओबीसीसाठी स्वतंत्र रकाना देण्याची मागणी
गोरेगाव,
OBC Community Boycotts Census देशांतर्गत होणार्या जणगणनेमध्ये इतर मागासवर्गीय म्हणजेच ओबीसीचा रकाना नसल्याने ही जणगणना आम्हाला मान्य नाही. त्यामुळे आम्ही सर्व ओबीसी समाज बांधव या जणगणेवर बहिष्कार करित असल्याचे प्रतिपादन तालुक्यातील मोहाडी येथील सर्व ओबीसी समाज बांधवानी केले आहे. मोहाडी येथील माता चौक येथे ओबीसी संघर्ष समितीचे अध्यक्ष बबलू कटरे यांच्या मार्गदर्शनाखाली समाज बांधवाची सभा घेण्यात आली. यावेळी समस्त ओबीसी बांधवांनी जणगणेचा तीव्र विरोध करून बहिष्कार केला. केंन्द्र सरकारकारनी ओबीसीची जणगणना करण्याची मान्यता दिली होती.
OBC Community Boycotts Census मात्र, मे 2026 मध्ये होणार्या संपूर्ण भारतभर जणगणेत ओबीसी करिता स्वतंत्र रकानाच नाही. त्यामुळे ओबीसी समाज बांधवाची जणगणना होणारच नाही, हे सर्व समाज बांधवांना समजले आहे. त्यामुळे या देशामध्ये बहुसंख्य ओबीसी असलेल्या समाजाची जणगणना होणार नाही. त्यामुळे ओबीसी समाज बांधवाना मिळणार्या सोई सुविधा, पुढील पिढीला मिळणारे आरक्षण यापासून वंचित राहावे लागेल. हे लक्षात घेऊन ओबीसी समाज बांधवानी एल्गार पुकारत जणगणेवर बहिष्कार घातला आहे. ओबीसीचा रकाना नसने म्हणजे ओबीसी समाजाकडे दुर्लक्ष करून ओबीसी समाजाला सोई सुविधांपासून वंचित ठेवण्याचा शासनाचा हा घाट आहे, असे मत यावेळी समाज बांधवांनी व्यक्त केले. ओबीसीची नोंद न घेणे म्हणजेच भाविष्यातील आरक्षण कल्याणकारी योजना व हक्कापासून दूर ठेवण्याचा प्रकार असल्याचा आरोप यावेळी बबलू कटरे यांनी केला आहे. दरम्यान, गोरेगावच्या तहसीलदार यांच्या मार्फत राष्ट्रपती व गृहमंत्री भारत सरकार व जिल्हा अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मोहाडी ग्रांम पंचायतचे सरपंच नरेंद्रकुमार चौरागडे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक जे. जे. पटले, सेवानिवृत्त शिक्षक वाय. एफ. पटले, प्रमानंद तिरेले, शिवराम मोहनकार आदी ओबीसी समाज बांधव उपस्थित होते.