प्रभसिमरनचा ऐतिहासिक पराक्रम; आयपीएलमध्ये रचला नवा विक्रम

    दिनांक :24-May-2026
Total Views |
मुबई,
New Record in the IPL पंजाब संघाचा युवा सलामीवीर प्रभसिमरन सिंग याने आयपीएल २०२६ मध्ये दमदार फलंदाजी करत मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. लखनौविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात त्याने अर्धशतकी खेळी साकारत या हंगामात पाचशे धावांचा टप्पा पार केला आणि स्पर्धेच्या इतिहासात अनकॅप खेळाडू म्हणून हा पराक्रम दोन वेळा करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला.
 
IPL
 
लखनौने दिलेल्या १९७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना प्रभसिमरनने आक्रमक फलंदाजीचे प्रदर्शन केले. त्याने अवघ्या ३९ चेंडूंमध्ये ६९ धावांची झंझावाती खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. New Record in the IPL या खेळीनंतर त्याच्या या हंगामातील धावसंख्येने पाचशेचा आकडा ओलांडला. यापूर्वीही त्याने २०२५ च्या हंगामात पाचशेहून अधिक धावा केल्या होत्या.
 
प्रभसिमरन आपल्या यशाचे श्रेय भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग यांना देतो. युवराजच्या मार्गदर्शनाखाली त्याच्या फलंदाजीत मोठा बदल झाल्याचे दिसून आले आहे. New Record in the IPL आक्रमक शैली, वेगवान धावगती आणि दीर्घ खेळी करण्याची क्षमता यामुळे तो पंजाब संघाचा महत्त्वाचा आधार बनला आहे.
 
या सामन्यात पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यर यानेही जबरदस्त फलंदाजी करत नाबाद शतक झळकावले. प्रभसिमरन आणि अय्यर या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी मोठी भागीदारी रचत संघाला सहज विजय मिळवून दिला. New Record in the IPL पंजाबने हे आव्हान दोन षटके शिल्लक असताना पूर्ण केले.
 
या विजयामुळे पंजाब संघाने गुणतालिकेत मोठी झेप घेतली असून प्लेऑफच्या शर्यतीत आपले आव्हान कायम ठेवले आहे. मात्र पुढील समीकरण आता इतर सामन्यांच्या निकालांवर अवलंबून असणार आहे. New Record in the IPL राजस्थान आणि मुंबई यांच्यातील सामन्याकडे आता पंजाबच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे, कारण त्या निकालावर पुढील फेरीचे चित्र स्पष्ट होणार आहे.