599 पैकी केवळ 62 शेतकऱ्यांची ज्वारी खरेदी..!

    दिनांक :24-May-2026
Total Views |
नाफेड केंद्राचे उद्दिष्ट वाढवून ज्वारी खरेदी सुरू करा
अन्यथा भारतीय किसान संघाचे तीव्र आंदोलन

पारवा, 
Procurement of Farmers' Sorghum या परिसरातील 599 पैकी केवळ 62 शेतकऱ्यांची ज्वारी खरेदी नाफेडने केली असून 537 शेतकरी अजूनही प्रतीक्षेत आहेत. घाटंजी तालुक्यात नाफेडद्वारे सुरू असलेली शासकीय ज्वारी खरेदी केवळ 1365 क्विंटलचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे सांगून अचानक बंद करण्यात आली आहे. प्रशासनाच्या या मनमानीमुळे तालुक्यातील शेकडो शेतकरी संकटात सापडले असून, याविरोधात भारतीय किसान संघाने आक्रमक भूमिका घेतली आहे.
 
 
jawari dksl
 
भाकिसंने जिल्हा उपनिबंधकांना ई-मेलद्वारे निवेदन पाठवून हे केंद्र त्वरित सुरू करण्याची मागणी केली आहे. घाटंजी तालुक्यात यंदा एकूण 599 ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांनी शासकीय दराने विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी केली होती. मात्र, केवळ 62 शेतकèयांची ज्वारी खरेदी करून केंद्र बंद करण्यात आले. त्यामुळे उर्वरित 537 शेतकरी ज्वारी विकण्यासाठी केंद्राच्या चकरा मारत असून हवालदिल झाले आहेत.
 
 
Procurement of Farmers' Sorghum  पावसाळा तोंडावर असल्याने आणि खुल्या बाजारपेठेत व्यापारी शेतकèयांची आर्थिक लूट करत असल्याने शासकीय हमीभावाने खरेदी सुरू होणे अत्यंत गरजेचे आहे. प्रशासनाने या गंभीर बाबीची तत्काळ दखल घेऊन घाटंजी केंद्राचे ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट वाढवून सर्व 537 शेतकèयांची ज्वारी खरेदी करावी, अशी मागणी केली आहे. केवळ 1365 क्विंटल ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट दाखवून 537 शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणे अन्यायकारक आहे. प्रशासनाने 3 दिवसांत ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट वाढवून केंद्र पुन्हा सुरू न केल्यास, भारतीय किसान संघ शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, असा इशारा भारतीय किसान संघाचे विदर्भ प्रांत युवाप्रमुख राम जिल्लडवार यांनी दिला.