स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; देहव्यापाराचा पर्दाफाश

    दिनांक :24-May-2026
Total Views |
पुणे
Pune spa raid गुन्हे शाखेच्या मानव तस्करी प्रतिबंधक कक्षाने वाघोली परिसरातील एका स्पा सेंटरवर छापा टाकून सुरू असलेल्या देहव्यापाराचा पर्दाफाश केला. या कारवाईत पाच महिलांची सुटका करण्यात आली असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
 

Pune spa raid 
महावीर सुदाम ससाणे (वय २९, रा. पेरणे फाटा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी वाघोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अन्य एका आरोपीविरोधातही पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.गुन्हे शाखेच्या मानव तस्करी व अनैतिक व्यापार प्रतिबंधक कक्षाला शुक्रवारी (दि. २२) गुप्त माहिती मिळाली होती की, वाघोली येथील बकोरी फाटा परिसरातील ‘९ सेन्सेस स्पा’ या स्पा सेंटरमध्ये महिलांकडून देहव्यापार करून घेतला जात आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी नियोजनबद्ध कारवाई करत बनावट ग्राहकाच्या माध्यमातून माहितीची खातरजमा केली.त्यानंतर पोलिस निरीक्षक छगन कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने स्पा सेंटरवर अचानक छापा टाकला. छाप्यामध्ये स्पा सेंटरमध्ये सुरू असलेला अनैतिक व्यवसाय उघडकीस आला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत तेथून पाच पीडित महिलांची सुटका केली. तसेच घटनास्थळावरून महावीर ससाणे याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.या प्रकरणाचा पुढील तपास वाघोली पोलिसांकडून सुरू असून, या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी स्पा सेंटरमधील कागदपत्रे आणि इतर साहित्यही जप्त केले आहे.
ही कारवाई पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलिस आयुक्त Pune spa raid  संजय दराडे, गुन्हे शाखेच्या अपर पोलिस आयुक्त तेजस्विनी सातपुते, पोलिस उपायुक्त गौहर हसन आणि सहाय्यक पोलिस आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंधक कक्षाचे पोलिस निरीक्षक छगन कापसे, पोलिस अंमलदार भिवरकर, आंधळे, केदार, जाधव, रसाळ, कोंडे तसेच महिला पोलिस अंमलदार कंक आणि खेडेकर यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली.