पुसद,
Rescue of Cattle कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या गोवंशांची माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे कारवाई करत कत्तलीसाठी निर्जन ठिकाणी डांबून ठेवलेल्या 10 गोवंशांची सुखरूप सुटका केली. ही संयुक्त कारवाई शनिवार, 23 मे रोजी रात्री केली गेली. पोलिस सूत्रांनुसार, पुसदमधील केजीएन नगर, इंदिरानगर परिसरातील निर्जन ठिकाणी 2 गायी, 3 गोèहे आणि 5 बैल अशा एकूण 10 गोवंशांना चारा-पाणी नसलेल्या अवस्थेत बांधून ठेवण्यात आले होते.
Rescue of Cattle पोलिसांनी तत्काळ कारवाई करत या सर्व जनावरांची मुक्तता केली. जप्त करण्यात आलेल्या गोवंशांची अंदाजे किंमत 2 लाख 60 हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी मुसब्बीरखान मेहबूबखान (35, मस्तान चौक, गढी वॉर्ड) याच्याविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारित) अधिनियम आणि प्राण्यांना क्रूरतेने वागवणे प्रतिबंधक कायद्यान्वये शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही संयुक्त कारवाई शहर पोलिस ठाणेदार सेवानंद वानखडे, वसंतनगर पोलिस ठाणेदार दिनेश झांबरे, ग्रामीण पोलिस ठाणेदार अशिष चौधरी, सहपोलीस निरीक्षक प्रेमकुमार केदार, उपनिरीक्षक नगीना शेख, संतोष खांडेकर, मनोज कदम, नितेश भालेराव, अमित पाटील, शेख मेहबूब, शुद्धोधन भगत, आकाश बाभुळकर, सुनील मदने, जलाल शेख, पंजाब दयाल व आरसीपी पथकाने केली.