लोकमान्यचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र

    दिनांक :24-May-2026
Total Views |
आष्टी (श.) :
Scholarship Examination लोकमान्य विद्यालयाचे पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत सहा विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत दोन विद्यार्थी पात्र ठरले आहेत. ही शिष्यवृत्ती परीक्षा २०२५-२६ ला घेण्यात आली होती.
 
 
Scholarship
 
Scholarship Examination  या परीक्षेत लोकमान्य विद्यालयाचे शिवम दारोकार, सार्थक कोहळे, गार्गी गोरे, कार्तिकी लोणकर, लावण्य क्षीरसागर, तनवी साळवीकर तर पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता पाचवीचे हितेश्री टेकाळे आणि ज्ञानकश्यप पाटील हे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरले आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष सुभाष गुप्ता, सचिव उमेश देशपांडे, मु‘याध्यापक जयदेव देशपांडे, उपमु‘याध्यापकह पंकज मांडवगणे, पर्यवेक्षक अनिल ढोले, सुनील मांडवे यांनी अभिनंदन केले.