शिरपूर होरे येथे सेंद्रिय शेतीचा नवा आदर्श

    दिनांक :24-May-2026
Total Views |
भूमी महिला शेतकरी गटाचा दशपर्णी अर्क उपक्रम
 
देवळी, 
Shirpur: Organic Farming रासायनिक खतांच्या वाढत्या खर्चामुळे शेती व्यवसाय तोट्यात जात असताना तालुका कृषी विभागाने आता बॅक टू बेसिसचा अवलंब करीत ‘विषमुत शेतीकडे वळा आणि सेंद्रिय शेतीची कास धरा,’ या उद्देशाने तालुयातील शिरपूर होरे येथे दशपर्णी अर्क तयार करण्याचे प्रात्यक्षिक कृषी विभागाच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आले. 
 
 
Organic Farming
 
खरीप हंगामाच्या पूर्वतयारीच्या पृष्ठभूमीवर सेंद्रिय शेती ही केवळ चर्चेपूर्ती मर्यादित न राहता ती एक चळवळ बनावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. फार्मर कप अंतर्गत पाणी फाउंडेशनच्या भूमी महिला शेतकरी गटाच्या माध्यमातून दशपर्णी अर्क तयार करून शेतकर्‍यांनी विषमुत शेतीचा संकल्प केला. देवळी तालुका कृषी अधिकारी निकेश इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली गावामध्ये जनजागृती मोहीम राबविण्यात आली. देवळी मंडळ कृषी अधिकारी प्रतीक्षा मेंढे यांनी सेंद्रिय शेतीचे महत्त्व विशद केले. घरच्या घरी दशपर्णी अर्क तयार करण्याची पद्धत, त्याचे फायदे आणि वापराचे तंत्र दाखवले. विशेष म्हणजे, यासाठी लागणारी साहित्य भूमी महिला शेतकरी गटातील सदस्यांनी श्रमदानातून उपलब्ध करून दिले.
 
 
 
Shirpur: Organic Farming  या उपक्रमामुळे शेतकरी खर्चात बचत आणि उत्पादन वाढ या दिशेने सकारात्मकपणे वाटचाल करत असल्याचे दिसून आले. शेतकर्‍यांनी घरच्या घरी बीज प्रकि‘या आणि जैविक औषधी निर्मितीवर भर दिल्यास येणारा खरीप हंगाम अधिक फायदेशीर ठरेल. सोबतच कृषी विभाग केवळ कार्यालय पुरता मर्यादित न राहता थेट बांधावर जाऊन शेतकर्‍यांना तांत्रिक मार्गदर्शन करत राहील, असे मंडळ कृषी अधिकारी प्रतीक्षा मेंढे यांनी सांगितले. यावेळी खरिपासाठी बीज प्रकि‘या आणि बीबीएफचा नमंत्र देण्यात आला. पेरणीपूर्वी बियाण्याची उगवण क्षमता महत्त्वाची असल्याचे कृषी सेवक किरण धवणे यांनी सांगितले. या उपक‘मामध्ये गटाच्या अध्यक्ष राधा लडके, विणा माडेलवर व महिला शेतकरी उपस्थित होत्या. कृषी ताई कविता मानकर यांनी आभार मानले.