शोएब इब्राहिम यांच्या वडिलांना पुन्हा ब्रेन स्ट्रोक

    दिनांक :24-May-2026
Total Views |
मुंबई
Shoaib Ibrahim टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता शोएब इब्राहिम आणि अभिनेत्री दीपिका कक्करयांच्या कुटुंबावर सध्या मोठे संकट ओढवले आहे. एका बाजूला दीपिका कक्कर यांच्या आरोग्याशी संबंधित उपचार सुरू असताना, दुसऱ्या बाजूला शोएब इब्राहिम यांच्या वडिलांना पुन्हा एकदा ब्रेन स्ट्रोक आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण कुटुंब चिंतेत असून चाहत्यांकडून सतत प्रार्थना आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
 

Shoaib Ibrahim  
शोएब इब्राहिम यांनी स्वतः त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की 23 मे रोजी सकाळी त्यांच्या वडिलांना पुन्हा ब्रेन स्ट्रोकचा झटका आला, त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करून आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे असून डॉक्टरांकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी चाहत्यांना भावनिक आवाहन करत वडिलांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करण्याची विनंती केली.
यापूर्वीही 2021 मध्ये शोएब इब्राहिम यांच्या वडिलांना ब्रेन स्ट्रोक आला होता. त्या वेळी मेंदूमध्ये रक्ताची गाठ झाल्यामुळे शरीराच्या डाव्या बाजूवर अंशतः लकवा आल्याची माहिती समोर आली होती. तेव्हापासून त्यांची प्रकृती सातत्याने निगराणीखाली असून घरातच केअरटेकरच्या मदतीने त्यांची काळजी घेतली जात होती.
दरम्यान, कक्कर-इब्राहिम Shoaib Ibrahim कुटुंबासाठी हा काळ आणखी कठीण ठरत आहे. अभिनेत्री दीपिका कक्कर यांना 2025 मध्ये लिव्हर ट्युमरचे निदान झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. अलीकडेच सिस्ट काढण्याची आणखी एक शस्त्रक्रिया पार पडली असून त्यांची प्रकृती अद्याप पूर्णपणे स्थिर नसल्याचे सांगितले जात आहे. जून 2025 मध्ये झालेल्या शस्त्रक्रियेनंतर त्यांना ट्युमरमुक्त घोषित करण्यात आले असले, तरी त्यांचा उपचार आणि पुनर्वसन प्रक्रिया सुरूच आहे.