पदाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांची उपस्थिती
राळेगाव,
Sorghum Procurement महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी राज्य शासनातर्फे खरेदी-विक्री संघाच्या माध्यमातून खरेदी करण्यासाठी व्यवस्था केली असून बुधवारपासून ज्वारी खरेदीसाठी शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शासकीय गोदामात रितसर उद्घाटन करण्यात आले.
शासनाचा ज्वारी हमीभाव 3699 रुपये जाहीर झाला असून शेतकèयांनी आपला माल बसस्थानकाजवळील या शासकीय गोदामात आणण्याचे आवाहन करून खरेदी-विक्री संघाचे सभापती मिलिंद इंगोले यांनी काटापूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर केंद्रावर ज्वारी प्रथम आणणारे सोनुर्ली येथील शेतकरी सुभाष भोयर यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
Sorghum Procurement ही योजना जिल्हा मार्केटिंग अधिकारी विजय गाढवे यांच्या मार्गदर्शनात राबवण्यात येणार असून यावेळी खरेदी-विक्री संघाचे संचालक श्रीधर थुटुरकर, विनोद भोकटे, अशोक काचोळे, कवडू कांबळे, प्रशांत बहाळे, पुरवठा निरीक्षण अधिकारी चंद्रकांत पाटील, पुरवठा निरीक्षक संघप्रिय भवरे, गोदाम व्यवस्थापक शुभम वानखेडे, सहायक निबंधक डोंगरे, व्यवस्थापक संजय जुमडे, लेखापाल गणेश हिवरकर, रोशन शिवरकर, गौरव आत्राम यांच्यासह अनेक शेतकरी, मापारी अनिल गुजरकर उपस्थित होते, अशी माहिती खरेदी विक्री संघाचे संचालक श्रावणसिंग वडते यांनी दिली.