गया,
Stones pelted at Union Minister Manjhi बिहारमधील गया जिल्ह्यात केंद्रीय मंत्री जितन राम मांझी यांच्यावर दगडफेक झाल्याची घटना समोर आली असून यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. शुक्रवारी संध्याकाळी खिजरासराय परिसरातील एका खासगी शाळेच्या कार्यक्रमात ते भाषण करत असताना काही समाजकंटकांनी मंचाच्या दिशेने दगडफेक केली. फेकण्यात आलेले दगड त्यांच्या अगदी जवळ येऊन पडल्याने काही काळ कार्यक्रमस्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने या घटनेत मांझी यांना कोणतीही दुखापत झाली नाही.
या प्रकारानंतर सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. Stones pelted at Union Minister Manjhi दगडफेकीमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला.
घटनेनंतर काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. विविध पोलीस ठाण्यांतील पथके घटनास्थळी दाखल झाली आणि सुरक्षा वाढवण्यात आली. Stones pelted at Union Minister Manjhi या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. या घटनेवर प्रतिक्रिया देताना जितन राम मांझी यांनी काही लोकांना चांगले काम होताना पाहवत नसल्याचे सांगितले. नेमके काय घडले हे स्पष्टपणे दिसले नसले तरी दूरवरून दगडफेक करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले.
दरम्यान, अलीकडच्या काळात मांझी कुटुंबावर हल्ल्यांच्या घटना वाढल्या आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्या वहिनी आणि पक्षाच्या आमदार ज्योती मांझी यांच्यासोबतही गैरवर्तन झाल्याची घटना घडली होती. त्यांच्या वाहनाला अडवून वाद घालण्यात आला आणि वाहनाची तोडफोड करण्याचाही प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला होता. Stones pelted at Union Minister Manjhi याच पार्श्वभूमीवर, समाजमाध्यमावर जितन राम मांझी यांना धमकी देणारा एक चित्रफीत संदेशही समोर आला होता. या प्रकरणात पोलिसांनी वेगाने कारवाई करत संबंधित आरोपीला अटक केली आहे. सध्या या सर्व घटनांची चौकशी सुरू असून सुरक्षा यंत्रणा सतर्क करण्यात आल्या आहेत.