मंगरूळनाथ,
Stop the slaughter and trafficking of cattle मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बकरी ईद सणाच्या दिवशी गाय व गोवंश हत्या रोखण्यासाठी व तस्करी थांबविण्यासाठी दिलेल्या निर्देशांचे व आदेशाची अंमलबजावणी करावी व त्यानुसार तालुक्यात पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी केशव गोरक्षण, सुमन गोरक्षण, बजरंग दल व विहिपच्या कार्यकर्त्यांसह गो भक्त सतीश हिवरकर यांनी पोलिस विभागास केली आहे.
बकरी ईद हा सण जवळच येवून ठेपला असून, या दिवशी भारतीय संविधानाचे अनुछेद ४८ मधील तरतूदीनुसार गायी, वासरे, गोवंशाचे जतन, महाराष्ट्र राज्य प्राणी संरक्षण अधिनियम १९७६, प्राण्यांना निर्दयपणे वागविण्यास प्रतिबंध १९५० व इतर अनुवंशिक नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी. मंगरूळनाथ शहर गोवंश व गोमांस निर्गमन करण्याचा केंद्र बिंदू असून, येथून गोमांस निर्यात व गोवंश कत्तल मोठ्या प्रमाणात होत असल्याने संबंधित अधिकार्यांनी विशेषतः दक्षता घ्यावी. ईद निमित्त गायीची व गोवंशाची कत्तल होवू नये यासाठी पोलिस विभागातर्फे शहरात व ग्रामीण भागात गस्त वाढवावी.
Stop the slaughter and trafficking of cattle आवश्यकतेनुसार जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे, शहरात येणार्या व जाणार्या वाहनाची कसून चौकशी करावी. नागरिकांनी देखील गाई वासरे संशयास्पद परिस्थितीत आढळल्यास ११२ क्रमांक वर कॉल करून पोलिस प्रशासनाला माहिती द्यावी, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देताना जेष्ठ विधिज्ञ बी. एम. ठाकरे विनोद जाधव, पांडुरंग कोठाळे, डॉ. दिलीप रत्नपारखी, प्रकाश मुंधरे, गजानन हिवरकर, संतोष आवटे, स्वप्निल निलटकर, प्रा.प्रशांत तळेकर, विकास चौधरी, दिनेश वाघ, ललित जोगे, किशोर लांडकर, केशव गोरक्षणचे संतोष बियाणी, परसराम महाकाळ, गजेंद्र बजाज हभप दत्ता महाराज पाकधणे, विजय बियाणी, अनिल काटकर, उज्वल मिश्रा, प्रबोध महाजन व अनेक गोभक्त उपस्थित होते.