वॉशिंग्टन,
US Iran Talks in Final Stages अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये संभाव्य सामंजस्य कराराची चिन्हे दिसू लागली आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतची चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचल्याचे संकेत दिले असून काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर अद्याप चर्चा सुरू असल्याचे सांगितले आहे. येत्या काही दिवसांत या कराराबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या घडामोडींनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी ट्रम्प यांच्याशी दूरध्वनीवर संवाद साधत त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी ट्रम्प सातत्याने प्रयत्न करत असल्याचे त्यांनी म्हटले. या प्रक्रियेत पाकिस्तानही मध्यस्थीची भूमिका बजावत असल्याचे संकेत त्यांनी दिले. US Iran Talks in Final Stages शहबाज शरीफ यांनी सांगितले की, ट्रम्प यांनी सौदी अरेबिया, कतार, तुर्की, इजिप्त, संयुक्त अरब अमिरात, जॉर्डन आणि पाकिस्तानसह अनेक देशांशी चर्चा केली आहे. पाकिस्तानचे लष्करी प्रमुख आसिम मुनीर यांनीही या चर्चांमध्ये सहभाग घेत ट्रम्प यांच्या प्रयत्नांचे समर्थन केले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रस्तावित करारानुसार, होर्मुझ सामुद्रधुनी पुढील साठ दिवस कोणत्याही शुल्काशिवाय आंतरराष्ट्रीय जहाजवाहतुकीसाठी खुली ठेवली जाईल. या काळात इराण तेथे लावण्यात आलेले भूसुरुंग हटवण्यास तयार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे तेल आणि व्यापार वाहतूक सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. अमेरिकेकडून इराणवरील काही निर्बंध शिथिल करण्याचाही विचार सुरू असल्याचे वृत्त आहे. US Iran Talks in Final Stages इराणच्या बंदरांवरील काही निर्बंध हटवून तेल निर्यातीला सवलत देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याबदल्यात इराणने अण्वस्त्र निर्मिती न करण्याची हमी देणे, युरेनियम संवर्धन कार्यक्रम थांबवणे आणि उच्च संवर्धित युरेनियम साठ्यावर नियंत्रण ठेवणे यासारख्या अटींवर चर्चा सुरू आहे.
दरम्यान, पश्चिम आशियातील परिस्थिती लक्षात घेता अमेरिकेचे सैन्य पुढील काही काळ त्या भागातच तैनात राहणार असल्याचेही सांगितले जात आहे. US Iran Talks in Final Stages अंतिम करार झाल्यास अमेरिकेकडून इराणची गोठवलेली मालमत्ता मुक्त करण्याबाबतही चर्चा होऊ शकते. या संभाव्य करारामुळे मध्यपूर्वेतील तणाव कमी होण्याची आशा व्यक्त केली जात आहे.