मुंबई
Vaibhav Suryavanshi इंडियन प्रीमियर लीगमधील आपल्या प्रभावी आणि लक्षवेधी कामगिरीची परंपरा कायम राखत, वैभव सूर्यवंशीने रविवारी इतिहास घडविला. टी-20 लीगमध्ये सर्वाधिक धावा करणारा किशोरवयीन खेळाडू होण्याचा मान त्याने मिळवला.
Vaibhav Suryavanshi राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळणाèया या 15 वर्षीय फलंदाजाला, मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात मैदानात उतरताना हा विक्रम मोडण्यासाठी केवळ दोन धावांची गरज होती. त्याने विल जॅक्सच्या गोलंदाजीवर दुसरी धाव घेत हा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला. यासह, टी-20 स्पर्धेत एखाद्या किशोरवयीन खेळाडूने केलेल्या सर्वाधिक धावांचा आधीचा विक्रम त्याने अधिकृतपणे मोडीत काढला.
Vaibhav Suryavanshi 2026 मध्ये सूर्यवंशीने आतापर्यंत 14 सामन्यांत 483 धावा केल्या आहेत. किशोरवयीन फलंदाजांच्या यादीतील यापूर्वीचा विक्रम देवदत्त पडिक्कलच्या नावावर होता. त्याने 2019-20 च्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत, कर्नाटक क्रिकेट संघाकडून खेळताना वयाच्या 19 व्या वर्षी 580 धावा केल्या होत्या.