उबाठाला भगदाड

    दिनांक :24-May-2026
Total Views |
माजी जिल्हाप्रमुखांसह शेकडो सैनिक भाजपामध्ये दाखल
 
वाशीम, 
Washim: Shiv Sena (UBT) Faction उबाठा शिवसेना गटाला वाशीम जिल्ह्यात मोठा राजकीय धक्का बसला आहे. पक्षाचे मावळते जिल्हाप्रमुख सुरेश मापारी यांनी बंडाचे निशाण फडकवत भाजपची वाट धरली आहे. आपल्या शेकडो समर्थकांसह त्यांनी आज, २४ मे रोजी मुंबई येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश घेतला आहे. 
 
 
bjp
 
Washim: Shiv Sena (UBT) Faction  गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना (उबाठा) गटाची धुरा सांभाळणारे सुरेश मापारी हे जिल्हाभरात वजनदार नेते म्हणून ओळखले जातात. मात्र, नुकतेच त्यांना जिल्हाप्रमुख पदावरून बाजूला करण्यात आल्याने त्यांच्या गटात तीव्र नाराजी होती. ही नाराजी इतकी विकोपाला गेली की, अखेर त्यांनी पक्षाला रामराम करत भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. या राजकीय भूकंपाने जिल्ह्यातील शिवसेनेची ताकद कमी होण्याची चिन्हे असून, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची ताकद वाढणार आहे. यावेळी सुरेश आपारी यांनी भाजपाची ध्येयधोरणे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत सर्वांगीण प्रगती करीत असून, महाराष्ट्र हा मुख्यमंत्री देवेंद्र फणवीस मुखमंत्री यांच्या नेतृत्वात उत्कृष्ट जनहिताची कार्य करीत आहे. त्यामुळे प्रेरीत होऊन भाजपामध्ये प्रवेश केला असे मनोगत मापारी यांनी व्यक्त केले. तसेच वाशीमचे अपक्ष नगरसेवक गजानन लांडगे यांनी आमदार श्याम खोडे यांच्या मार्गदर्शनात व भाजपा जिल्हाअध्यक्ष पुरुषोतमा चितलांगे, नपचे भाजपा गटनेते बाळा मुरकुरे, सुनिल मालपाणी यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये जाहीर प्रवेश घेतला.