रिसोड येथे जागतिक चहा दिवसाचे आयोजन

    दिनांक :24-May-2026
Total Views |
रिसोड,
World Tea Day जागतिक चहा दिनानिमित्त रिसोड येथे पर्यावरण प्रेमी गजानन मुलंगे यांच्या निवासस्थानी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी चहाचे आरोग्यदायी सेवन, पर्यावरणपूरक सवयी आणि प्लास्टिकमुक्त जीवनशैली याबाबत जनजागृती करण्यात आली. कार्यक्रमात बोलताना गजानन मुलंगे यांनी चहा हे आजच्या आधुनिक जीवनातील महत्त्वाचे पेय असून, आप्तस्वकीयांमधील प्रेम आणि संवाद वाढविण्यात त्याची मोठी भूमिका असल्याचे सांगितले. मात्र, चहा मर्यादित प्रमाणात व कमी साखरेसह सेवन करणे आरोग्यास हितकारक असल्याचे त्यांनी नमूद केले.
 
 
World Tea Day
 
यावेळी नायब तहसीलदार विजय देशपांडे, सागर डांगे, प्राचार्य शरद टेमधरे, मयूर नकवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्लास्टिक पिशव्या व कागदी कपांच्या वाढत्या वापराबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. कागदी कप तयार करताना वापरल्या जाणार्‍या ‘बीपीए’ रसायनामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात, World Tea Day  अशी माहिती देत चहा पिण्यासाठी चिनी मातीचे किंवा काचेचे कप वापरण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मदन चौधरी, श्रावणी बरडे, दिया बरडे, कावेरी मुलंगे, लक्ष्मी मुलंगे, माधवी मुलंगे, अरुणा थोरात, मंदा थोरात व नंदा गांजरे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन गुणवंत थोरात यांनी केले. तर आभार राजेश्वर मुलंगे यांनी मानले.