परसोडी/सडक येथे विद्यार्थ्यांना सुसंस्काराचे धडे

    दिनांक :24-May-2026
Total Views |
सडक अर्जुनी, 
Zilla Parishad School: Student Camp तालुक्यातील परसोडी/सडक येथे 21 ते 31 मे दरम्यान ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, शिस्त, राष्ट्रभक्ती व सर्वांगीण विकास घडवून आणण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या श्री गुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबिर ला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जि. प. शाळा, परसोडी/स. येथे सुरू असलेल्या या शिबिरात विद्यार्थी विविध सुसंस्काराचे धडे आत्मसात करत आहेत.
 
 
Student Camp
 
Zilla Parishad School: Student Camp आयोजित शिबिरात दरदिवशी दिंडी, प्रार्थना, योगासन, प्राणायाम, व्यायाम, मल्लखांब, कवायत, भजन, श्लोक, हार्मोनियम, तबला वादन तसेच बौद्धिक सत्रांचे आयोजन करण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांना चांगले व्यक्तिमत्त्व, शिस्तबद्ध जीवन, व्यसनमुक्ती, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, पालकांचा आदर व राष्ट्रसेवेचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. शिबिरातील विविध उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि सामाजिक जाणीव निर्माण होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. सकाळपासून सायंकाळपर्यंत विद्यार्थी उत्साहाने सर्व उपक्रमांमध्ये सहभाग घेत आहेत. हे शिबिर श्री गुरुदेव सुसंस्कार गुरुकुल प्रकल्प, पळसगाव/सोनका येथील समीर कोरे यांच्या वतीने आयोजित करण्यात आले असून गावकर्‍यांकडूनही या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे. पालकांनी विद्यार्थ्यांना अशा संस्कारमय उपक्रमांमध्ये सहभागी करून घ्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.