वैनगंगा नदीत बुडून बारावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

पोलिसांकडून मृतदेहाचा शोध सुरू

    दिनांक :25-May-2026
Total Views |
आरमोरी,           
Wainganga River शहराजवळील वैनगंगा नदीत आंघोळीसाठी गेलेल्या बारावीच्या विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी 5.15 वाजताच्या दरम्यान घडली. विष्णू उर्फ वेदांत नंदकिशोर कुकडकर (17) रा. ठाणेगाव ता. आरमोरी असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
 
 
student drowns in Wainganga River
 
मिळालेल्या माहितीनुसार, विष्णू उर्फ वेदांत हा यावर्षी बाराव्या वर्गात प्रवेशित असून तो येथील महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत होता. रविवारी दुपारी 5 वाजताच्या सुमारास तो आपल्या दोन मित्रांसोबत आरमोरीजवळील वैनगंगा नदीत आंघोळीसाठी गेला होता. Wainganga River आंघोळ सुरू असताना अचानक तो खोल पाण्यात गेल्याने त्याला पाण्याचा अंदाज आला नाही व काही क्षणातच तो पाण्यात बुडाला.
 
 
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनीही घटनास्थळी पोहोचून शोधमोहीम सुरू केली. मात्र बराच वेळ शोध घेऊनही मृतदेह बाहेर न आल्याने सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रताप लामतुरे तसेच पोलिसांचे पथक नदीत उतरून शोधकार्य करीत आहेत. Wainganga River विष्णूच्या लहानपणीच त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. त्याच्या पश्‍चात आई व एक लहान भाऊ असा परिवार आहे. घरातील कर्त्या व्यक्तीचा आधार हरपलेल्या या कुटुंबावर आता दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण ठाणेगाव परिसरात शोककळा पसरली आहे.