खाजगी ट्रॅव्हल्स पलटल्याने 18 प्रवासी जखमी

तीन प्रवासी गंभीर

    दिनांक :25-May-2026
Total Views |
धानोरा-मुरूमगाव मार्गावरील वडगाव जवळची घटना
 
धानोरा, 
Private Bus Overturns छत्तीसगड राज्यातून येणार्‍या खाजगी ट्रॅव्हल्स चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल्स पलटून झालेल्या अपघातात 18 प्रवासी जखमी झाले. यामध्ये तीन प्रवासी गंभीर जखमी झाल्याची घटना आज, 24 मे रोजी दुपारी 12.45 वाजताच्या सुमारास धानोरा- मुरूमगाव मार्गावरील वडगाव जवळ घडली.
 

Private Bus Overturns 
 
दल्ली (छत्तीसगड) येथून गडचिरोलीकरिता दररोज सकाळी 9 वाजता ट्रॅव्हल्स सुरू असते. आज चालक व वाहकासह एकूण 36 प्रवासी घेऊन सदर ट्रॅव्हल्स गडचिरोलीकडे जात असताना अचानक वडगाव जवळ चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे गाडी रस्त्याच्या कडेला जाऊन पलटली. Private Bus Overturns यावेळी एकच गोंधळ उडाला. बसमधील जखमी प्रवाशांचा आरडाओरड ऐकून स्थानिक नागरिक तसेच घटनेची माहिती होताच धानोरा पोलिस व भाजपा पदाधिकार्‍यांनी तत्परता दाखवत त्वरित धाव घेऊन बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यास मदत केली. त्यानंतर अ‍ॅम्बुलन्सने जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. ट्रॅव्हल्स पलटली तो रस्ता अतिशय खराब असल्याने वेग अतिशय कमी होता. सदर ट्रॅव्हल्स पलटून सुदैवाने एका झाडाला अडकली. अन्यथा परिस्थिती आणखी गंभीर झाली असती. ट्रॅव्हल्स चालक मद्य प्राशन करून असल्याचे प्रवाशांनी सांगितले.
 
 
या अपघातात कृष निमगडे (69) रा. मारोडा, बंडू खोब्रागडे (63) रा. मारोडा, मिस्टी नरोटे (10) रा. मोवाड, चांदणी साहू (29) रा. कोरची, पंचराम पटेल (55) चंद्रपूर, देवदास झगराह (22) रा. कोरची, उदय देवांगण (50) रा. चंद्रपूर, ललिता साहू (38) रा. चंदन बेवडी, जानको पोया (55) रा. मोवाड, लता नरोटे (55) रा. मोवाड, भूपेंद्र साहू (45) रा. कोरची, गुलाबो पटेल (60) रा. शिवणी, शेखर उईके (29) रा. अंतगड, गोपीचंद कुणबी (33) रा. दल्ली, प्रदिप कुमार (23), नीलकंठ वाडके (58) रा. मारोडा, चांदणी रामटेके (23) रा. तोरगाव तसेच चालक रवी चावरे (35) रा. दल्ली (छत्तीसगड), अशी जखमींची नावे आहेत. नीलकंठ वाडके, चांदणी रामटेके व चालक रवी चावरे हे तिघे गंभीर जखमी असल्याने त्यांना गडचिरोलीच्या रुग्णालयात रेफरकरण्यात आले आहे. Private Bus Overturns घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात ठेवता आली. अपघाताचे नेमके कारण पोलिसांकडून शोधले जात आहे.