वाहनाची काच फोडून ७५ हजार रुपये लंपास

कारंजा बायपास परिसरात पुन्हा चोरी

    दिनांक :25-May-2026
Total Views |
कारंजा लाड,
Breaking Vehicles Window शहरातील बायपास परिसरात वाहनांचे काच फोडून चोरी करणारी टोळी पुन्हा सक्रिय झाल्याचे मागील काही घटनांवरून समोर आले आहे.सोमवारी २५ मे रोजी दुपारच्या सुमारास बायपास येथील गुप्ता सुपर शॉपीसमोर उभी असलेल्या अ‍ॅपे वाहनाची काच फोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल ७५ हजार रुपयांची रोकड लंपास केली.
 
 
Breaking Vehicles Window
 
मिळालेल्या माहितीनुसार, पातूर नंदापूर येथील एका शेतकर्‍याने बैलजोडी विक्री करून मिळालेली रक्कम टाटा एस वाहनात ठेवली होती.शेतकर्‍याचे नाव मात्र कळू शकले नाही. संबंधित व्यक्ती काही वेळासाठी वाहनापासून दूर गेल्याचा फायदा घेत चोरट्यांनी गाडीचा काच फोडला व आत ठेवलेली रोकड घेऊन पसार झाले. घटना घडताच परिसरात एकच खळबळ उडाली.या प्रकारामुळे कारंजा शहर व बायपास परिसरात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वाहनांचे काच फोडून चोरी करणारी टोळी सक्रिय असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. यापूर्वीही अशाच प्रकारच्या घटना घडल्या असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. Breaking Vehicles Window स्थानिक नागरिकांनी पोलिस प्रशासनाने या घटनांकडे गांभीर्याने लक्ष देऊन चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे. तसेच बायपास परिसरात पोलिस गस्त वाढविण्याचीही मागणी होत आहे.
 
 
शहरात चोरीच्या घटनात वाढ
मागील काही दिवसापूर्वी शहरातील स्टेट बँक परिसरात ताटके यांच्या गाडीच्या डिक्कीतून अडीच लाख रुपये अज्ञात चोरट्यांनी लंपास केले.त्यानंतर एका घरातून लाखो रुपयांच्या मुद्देमालावर चोरट्यांनी हात साफ केला. Breaking Vehicles Window यातील चोरटे शोधण्यात पोलिसांना यश देखील आले.तर मागील आठवड्यात बायपास परिसरात मानोरा येथील व्यापार्‍याचे कारचा काच फोडून २० लाख रुपये चोरट्यांनी पळविले.आणि सोमवारी दुपारी बायपास परिसरात एका शेतकर्‍याचे वाहनाचा काच फोडून ७५ हजार चोरीला गेले.यावरून शहरात चोरीच्या घटनांत वाढ झाल्याचे दिसून येते.