नागपूर,
Sindhu College दादा रामचंद बाखरू सिंधू महाविद्यालयाच्या वतीने महाविद्यालयाच्या सभागृहात “शैक्षणिक उत्कृष्टता पुरस्कार समारंभ” उत्साहात आयोजित करण्यात आला. शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. हा समारंभ सिंधी हिंदी विद्या समितीच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. या वेळी व्यवस्थापन समितीचे सदस्य, प्राचार्य, उपप्राचार्य, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. Sindhu College प्रमुख पाहुणे म्हणून सिंधी हिंदी विद्या समितीचे अध्यक्ष डॉ. आय. पी. केसवानी, अध्यक्ष डॉ. विंकी रूघवानी, सरचिटणीस नीरज बाखरू आणि सचिव पंकज रूघवानी उपस्थित होते. तसेच समितीअंतर्गत येणाऱ्या विविध शाळांचे प्राचार्य व उपप्राचार्यही या कार्यक्रमाला उपस्थित होते.
दादा रामचंद बाखरू सिंधू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एम. पेंडसे यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमात सिंधी हिंदी विद्या समितीअंतर्गत विविध संस्थांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना रोख रक्कम व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. Sindhu College यामध्ये दादा रामचंद बाखरू सिंधू महाविद्यालय, श्री मोहनलाल रूघवानी सिंधी हिंदी हायस्कूल, श्री फतेहचंद केसवानी हायस्कूल, बाबा नानक हायस्कूल, सिंधी हिंदी हायस्कूल (खामला), केटीआर सिंधू इंग्लिश हायस्कूल आणि साधू वासवानी सिंधी हिंदी हायस्कूल येथील टॉपर विद्यार्थ्यांचा समावेश होता.
यावेळी काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचा पाठिंबा, मेहनत आणि आत्मविश्वास यामुळे यश मिळाल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे नियोजन व समन्वय कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. सीमा अच्छपिला यांनी उत्तमरीत्या पार पाडले. Sindhu College कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभावीपणे करण्यात आले. शेवटी कनिष्ठ महाविद्यालयाच्या गणित विषयाच्या शिक्षिका राणी चांदनानी यांनी आभार प्रदर्शन केले. त्यांनी उपस्थित मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी आणि आयोजन समितीचे सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचा समारोप प्रेरणादायी आणि उत्साहपूर्ण वातावरणात झाला.
सौजन्य: मिलिंद शिनखेडे, संपर्क मित्र