वर्धा,
Drunk Drivers जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण वाढल्याने विेशेष मोहीम राबवून दारू ढोसुन वाहन चालविणार्यांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये सेवाग्राम पोलिस ठाणे ३, अल्लीपूर ३, आर्वी १, कारंजा २, पुलगाव ३ व वाहतूक नियंत्रण शाखा वर्धा अंतर्गत ४ अशा १६ जणांवर कारवाई करण्यात आली.

नाकाबंदीदरम्यान वाहनचालकांची तपासणी केली असता अमोल थूल (४४) रा. वरुड, विक्की राऊत (३२) रा. मनीषनगर मसाळा, अनंता बोरेकार (५२) रा. फुकटा, दामोदर शेलकर (५०) रा. शिरसगाव, आकाश जगताप (२८) रा. खरवडा जि. चंद्रपूर, नरेंद्र डोंगरे (४३) रा. कारंजा, निलेश डोबले (३५) रा. खैरी पुनर्वसन कारंजा, योगेश तलमले (३७) रा. घुबडटोली पुलगाव, उमेश जुआरे (५८) रा. रोहना, दिवाकर पारीसे (४०) रा. चिंचोली, अमरावती, Drunk Drivers करण फडके (५६) रा. गणेशनगर, बोरगाव (मेघे), आनंद पाटील (६४) रा. येळाकेली, अजय भोयर रा. केशव सिटी सिंदी (मेघे), सचिन शेंडे रा. बोरगाव (मेघे) यांची वैद्यकीय तपासणी केली असता ते दारू पिऊन असल्याचे स्पष्ट झाले. ही विशेष मोहीम दररोज वर्धा जिल्ह्यात राबविण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक, वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने कळवण्यात आले आहे.