साडे पाच एकर जमीन दान; महाकालीसाठी महाविकास आराखडा

पं. अग्निहोत्री यांची पत्रकार परिषदेत माहिती

    दिनांक :25-May-2026
Total Views |
वर्धा, 
Agnihotri's Press Conference दक्षिणेची काशी प्रसिद्ध असलेल्या जागृत देवस्थान महाकाली देवस्थानाचा विकास करण्यासाठी आपण स्वत: साडे पाच एकर जमीन मंदिर संस्थानला दान केली आहे. या परिसराचा धार्मिक दृष्टीने विकास करण्यासाठी देवीची एकावन शतीपिठं, चार धाम, महाराष्ट्रातील अष्टविनायक आदींचे एकत्र पवित्र धार्मिक स्थळ निर्माण व्हावे यासाठी तीस ते चाळीस कोटींचा प्रस्ताव मंदिराच्या वतीने राज्य शासनाला पाठवण्यात आला असल्याची माहिती पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी आज २५ रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. देशात पर्यटनाला चालना देण्याचे काम सरकारच्या वतीने करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आपण महाकाली देवस्थान महाकालीचा महाविकास आराखडा तयार केला आहे. महाकालीचे नावलौकिक आहे. या ठिकाणी नवरात्र, दिवाळी, दसरा, दर पौर्णिमा व अमावस्येला भतांची गर्दी असते. या ठिकाणी माता महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वती जागरूक असून भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात. या देवस्थानच्या विकासासाठी आपण स्वत: साडे पाच एकर जमीन दान केली असून महाविकास आराखड्याद्वारे या महाकाली देवस्थानाचा सर्वांगिण विकास करण्यात येणार आहे.
 
 

r656 
 
 
त्याकरिता ३० ते ४० कोटी रुपये निधी अपेक्षित असून तसा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विकास विभागाला सादर करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. या ठिकाणी, देवीची एकावन्न शतिपीठे तयार करण्याचा आपला मानस आहे. शक्तिपीठांपैकी हिंगलाज, साखर माता किंवा कराची परिसरातील शक्तिपीठ हे पाकिस्तानात आहे. सुगंधा बांगलादेशातील शक्तिपीठ, काश्मीरमधील महामाया पीठ, हिमाचलप्रदेशातील ज्वालामुखी, पंजाबमधील जालंधर, झारखंडमधील देवघरचा वैद्यनाथ पीठ, नेपाळमधील काठमांडू येथील गुजयेश्वरी पीठ, तिबेटमधील मानस परिसरातील दाक्षायणी, ओडिशातील विरजा, नेपाळातील गंडकी, पश्चिम बंगालमधील बहुला पीठ, उज्जयिनी, महालक्ष्मी पीठ, कालामाधव तर नर्मदा आदी ५१ पिठांची येथे निर्मिती करण्यात येणार आहे. बद्रीनाथ, द्वारका, पुरी (जगन्नाथ) आणि रामेश्वरम यांचाही समावेश आहे. महाराष्ट्रातील अष्टविनायक मोरगाव येथील मोरेश्वर, सिद्धटेक, पाली, महड, थेऊर, लेण्याद्री, ओझर आणि रांजणगाव या ठिकाणांचे नियोजन आहे. यासोबतच जगाचे लक्ष असलेले अयोध्येचे राममंदिर, संकटमोचन हनुमान मंदिर, शिवमंदिर, श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली ते ठिकाण ज्योतिसर, गोवर्धन पर्वत, भगवान महावीर, गौतम बौद्ध, छत्रपती शिवाजी महाराज व महाराणा प्रताप अश्वारूढ पुतळा गोशाळा निर्मिती करण्यात येणार आहे. आताही आपल्याकडे दोनशे गाईंची सेवा केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. यासोबत महाकाली येथे भतनिवास, भोजन कक्ष, पाकगृह, पार्किंग, बोटिंग, बगीचा, संगीत कारंजे, मनोरंजन गृहे, आदीं सोयी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.