पणन संचालनालयाचे परिपत्रक जारी
यवतमाळ,
Agricultural Produce Trading License राज्यात शेतमाल खरेदी-विक्री व्यवहार करण्यासाठी व्यापारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्यांनी वैध परवाना घेणे बंधनकारक असल्याचे पणन संचालनालयाने स्पष्ट केले आहे. याबाबतचे परिपत्रक पणन संचालक शरद जरे यांनी जारी केले आहे. महाराष्ट्रात महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम 1963 व नियम 1967 हा कायदा अस्तित्वात आहे. या कायद्यामधील तरतूदीनुसार राज्यातील शेतमाल खरेदी-विक्री चे विनियमन करण्यात येते.
सध्या अनेक व्यापारी, काही संस्था, शेतकरी संस्था या मोठ्या प्रमाणात शेतमालाची खरेदी-विक्री कोणत्याही परवान्याविना करीत असल्याबाबतच्या तक्रारी संचालनालयास प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींच्या अनुषंगाने पणन संचालनालयाकडून संबंधितांना वेळोवेळी अशा प्रकारचे प्रकार करणे अनुचित असल्याबाबत कळवूनसुद्धा अनेक व्यापारी किंवा संस्था शेतमालाची विनापरवानगी खरेदी विक्री करीत असल्याचे पणन कार्यालयाच्या निदर्शनास आले आहे. महाराष्ट्र शासन राजपत्र अध्यादेश क्रमांक 15, 5 जुलै 2016 रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना निर्गमित झाल्या आहेत. तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र 31 डिसेंबर 2025 अन्वये मुख्य अधिनियमातील कलमांमध्ये आणखी सुधारणा केली आहे.
Agricultural Produce Trading License त्यानुसार परवाना अथवा बाजार समितीकडून कोणतीही परवानगी आवश्यक असेल, तथापी बाजार समितीद्वारे अशा परवानाधारकाकडून कोणतेही बाजार शुल्क आकारण्यायोग्य असणार नाही. या तरतुदीनुसार थेट पणन, खाजगी बाजार, शेतकरी ग्राहक बाजार व ई-ट्रेडींग प्लॅटफॉर्म या प्रयोजनासाठी परवाना देण्यात येतो. त्यामुळे यापुढे कोणत्याही व्यापारी, संस्था अथवा शेतकरी उत्पादक कंपन्या व शेतमालाच्या व्यापार करणाèया इतर घटकांनी कायद्यातील तरतुदींमध्ये नमूद परवान्याशिवाय शेतमाल खरेदी विक्रीचा व्यवसाय करू नये, अन्यथा संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पणन विभागाने दिला आहे.