रामनाथ स्वामी संस्थानचा वाद पेटला

वाढोणा रामनाथ येथे दोन गटात हाणामारी आठ गावकरी झाले जखमी

    दिनांक :25-May-2026
Total Views |
अमरावती, 
amnath Swami Sansthan in Amravati नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पोलिस स्टेशन मंगरूळ चवाळा हद्दीतल्या ग्राम वाढोणा रामनाथ येथे रामनाथ स्वामी संस्थान आहे. त्या संस्थानच्या मालकीच्या वर्चस्वातून दोन गटामध्ये जुना वाद आहे. त्यासंबंधाने धर्मादाय आयुक्तांकडे प्रकरण आहे. जुन्या वादातून दोन गटात रविवारी रात्री हाणामारी झाली. रविवारी रात्री १० वाजताच्या दरम्यान एका गटातील नितीन रामकुष्ण गायधनी (वय ५२ वर्ष, रा. वाढोणा रामनाथ) हे मंदिर परिसरातील तळ्यातला गाळ व पाणी काढत होते. बाजुला चिखल झाला म्हणून विरूध्द गटातील विनोद मोतीराम चौधरी (वय ६० वर्ष) यांनी घाण का केली असे नितीन गायधनी यांना विचारल्याने दोघांमध्ये वाद झाला.
 
 
amaravati
 
 
या वादामध्ये दोन्ही गटातील ३० ते ४० लोक एकमेंकाविरूध्द भिडले व मारपीटी झाली. सदर प्रकरणात दोन्ही गटातील ८ लोक जखमी झाले. त्यात साहिल गजानन धार्मीक, गणेश चंपतराव मते, राहुल मनोहर गायधनी, पवन शकर ठवक्कर, अशोक रामभाऊ गायधनी, अमोल साहेबराव गायधनी, शुभम विजय बोडळे, सुनील साहेबराव यावले यांचा समावेश आहे. त्याचेवर उपचार सुरू आहे. गुन्हा दाखल करून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. गावात शातंता असून योग्य तो बंदोबस्त लावण्यात आला आहे.