पहिल्या दिवशी १६ अर्जांची उचल

अमरावती विधान परिषद निवडणूक

    दिनांक :25-May-2026
Total Views |

Amravati
 
 
अमरावती, 
Amravati Legislative Council Election विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची अधिसूचना आज काढण्यात आल्याने अर्ज उचल व दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. पहिल्या दिवशी ८ प्रतिनिधींनी १६ नामांकन अर्जाची उचल केली. अमोल काळे यांनी भाजपाचे माजी आमदार प्रवीण पोटे यांच्यासाठी तीन व अनुराधा प्रवीण पोटे यांच्यासाठी दोन अर्जाची उचल केली. योगेश गांवडे यांनी स्वत:साठी दोन अर्ज घेतले. संदीप मेश्राम, विनित डोंगरदिवे, मो. सिद्दीकी यांनी स्वत:साठी प्रत्येकी एका अर्जाची उचल केली. डॉ. ओमप्रकाश झोड यांनी काँग्रेसचे माजी आमदार विरेंद्र जगताप यांच्यासाठी तीन अर्जाची तर ओम मेटकर यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध उर्फ बबलू देशमुख यांच्यासाठी तीन अर्जाची उचल केली. असे एकूण १६ अर्ज आज घेण्यात आले. एकही अर्ज दाखल झालेला नाही. १ जून ही अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. अद्याप कोणत्याच पक्षाने आपल्या अधिकृत उमेदवाराची घोषणा केलेली नाही. भाजपाचा उमेदवार दोन ते तीन दिवसात जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानंतरच काँग्रेसचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे. एक तगडा अपक्ष उमेदवार मैदानात येण्याची शक्यता आहे.